शोपिया/कुपवाडा - वारंवार होणाऱ्या दहशतवादी कारवायांमुळे काश्मीर खोरं धुमसतंय. आज सकाळदेखील शोपिया जिल्ह्यात पेट्रोलिंग करणाऱ्या जवानांवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात एक जवान जखमी झाल्याचे वृत्त समोर आले आहे. तर दुसरीकडे कुपवाडा जिल्ह्यातही जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान, जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे.
शोपियांतील अहगाम येथे जवानांचं पथक गस्तीवर होते. यावेळी दहशतवाद्यांनी गस्तीवर असलेल्या जवानांवर ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात एक जवान जखमी झाला. दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी जवानांनी परिसराला घेराव घालत शोधमोहीम सुरू केली आणि सडेतोड प्रत्युत्तरदेखील दिलं.
(Surgical Strike Video: भारतीय जवानांनी PoK मध्ये शिरून 'असा' केला होता दहशतवाद्यांचा खात्मा)
(हे आहेत पत्रकार शुजात बुखारींचे मारेकरी, पोलिसांनी प्रसिद्ध केली छायाचित्रे )
दहशतवाद्यांतर्फे मुलांचा हिंसाचारासाठी वापर
काश्मीर खोऱ्यामध्ये सुरक्षा दलांच्या जवानांवर दगडफेक करण्यासाठी जैश-ए-मोहमद व हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांनी अनेक अल्पवयीन मुलांचा वापर केल्याचा ठपका संयुक्त राष्ट्रांनी ठेवला आहे.