नवी दिल्ली - देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना आता आणखी एका फंगसचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनानंतर आता 'ब्लॅक फंगस'चा मोठा धोका असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. देशातील अनेक शहरांमध्ये ब्लॅक फंगसचा कहर पाहायला मिळत असून त्याचे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे लोकांना आरोग्यविषयक विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशीच धडकी भरवणारी माहिती पुन्हा एकदा समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे योग्य वेळी जर यावर उपचार झाले नाहीत तर रुग्णांना आपले डोळे गमवावे लागत आहेत. "म्युकोरमायकोसिस" असं या आजाराचं नाव असून कोरोना रुग्णांमध्ये हे प्रामुख्याने पाहायला मिळत आहे.
'ब्लॅक फंगस' म्हणजेच "म्युकोरमायकोसिस" हे एक गंभीर इन्फेक्शन आहे. ज्याचा परिणाम नाक, डोळ्यांवर होतो आणि मेंदूपर्यंतही हे इन्फेक्शन पोहोचतं. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. कोरोनानंतर आता 'ब्लॅक फंगस'चा मोठा धोका असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील एका डॉक्टरने यावर प्रभावी आणि अगदी किफायशीर असा उपचार केल्याचा दावा केला आहे. या डॉक्टरने 100 वर्षांपेक्षा जास्त जुना फॉर्म्युला सांगितला आहे. हा उपाय सर्वात स्वस्त आणि अचूक असल्याचं या डॉक्टरने सांगितलं आहे. जबलपूरमधील डॉ. अमरेंद्र पांडे यांनी हा दावा केला आहे.
भयंकर! कोरोनाग्रस्तांना आता 'या' आजाराचा मोठा धोका; जीव वाचवण्यासाठी 8 रुग्णांचे काढावे लागले डोळे
डॉ. अमरेंद्र पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आपल्या खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या कोरोना रुग्णांना या उपचारामार्फत ब्लॅक फंगससारख्या भयानक आजारापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा उपाय म्हणजे मिथलीन ब्लू. डॉ. पांडे यांच्या मते हे औषध अँटीफंगलचं काम करतं आणि अगदी सहजपणे उपलब्ध होतं. पण या औषधाचा वापर करताना व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या रुग्णांवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. रुग्णांच्या शरीरात हे औषध पोहोचवणारी व्हेंटिलेटर ट्युब आणि ऑक्सिजन ट्यूब वारंवार स्वच्छ करत राहायला हवी. यामळे फंगस निर्माण होत नाही आणि रुग्ण पूर्णपणे सुरक्षित राहतो असं पांडे यांनी म्हटलं आहे.
"मिथलीन ब्लूबाबत अनेकांना माहिती आहे. खाणीत काम करणाऱ्यांना किंवा गिर्यारोहकांना ऑक्सिजन पातळी वाढण्यासाठी हे औषध दिलं जातं. अगदी कमी मात्रेतही हे औषध ऑक्सिजनची पातळी वाढवतं. सोबतच अँटी फंगसचंही काम करतं. घरातील एक्वॅरियममधील माशांना फंगसपासून वाचवण्यासाठीही या औषधाचे ड्रॉप टाकले जातात" असं देखील अमरेंद्र पांडे यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. या इन्फेक्शनमुळे रुग्णांचे डोळेही काढावे लागत आहेत. सूरतमध्ये जीव वाचवण्यासाठी तब्बल 8 रुग्णांचे हे डोळे काढण्यात आले आहेत. गुजरातच्या सूरत शहरात गेल्या 15 दिवसांत अशी 40 प्रकरणं सापडली आहेत. त्यापैकी 8 रुग्णांचे डोळे काढावे लागल्याची घटना समोर आली आहे.