जबलपूर : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लस तयार करण्याचे काम जगभरातील संशोधक करत आहेत. तर मध्यप्रदेशातील जबलपुरमधील डॉक्टरांनी कोरोनाची सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांना आपल्या अनोख्या प्रयोगामुळे बरे केल्याचा दावा केला आहे. येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मेडिकल कॉलेजमध्ये एक प्रयोग करण्यात आला आहे. त्यामुळे हा प्रयोग कोरोनावर मात करण्यासाठी काळात मोठे शस्त्र बनू शकते.
मेडिकल कॉलेजच्या टीमने कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांना पोटातील जंतू मारण्याचे औषध देण्यास सुरुवात केली. त्यामुळे जे निष्पण झाले. ते आश्चर्यकारक आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, या औषधाचा गंभीर अशा कोरोना रूग्णांवर परिणाम झाला नाही, मात्र, कोरोनाची सौम्य लक्षणं असलेले १५० रुग्ण या औषधामुळे बरे झाले आहेत.
कोरोना आयसोलेशन हॉस्पिटलचे प्रभारी डॉ. संजय भारती यांनी सांगितले की, सुरुवातीला आम्ही काही कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांना इवरमेक्टिन औषधाचा डोस देण्यास सुरवात केली. हेच तेच औषध आहे, जे अनेक मुलांना पोटातील जंतू मारण्यासाठी दिले जाते. औषधाचा कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांवर प्रचंड परिणाम झाला आणि ५ ते ६ दिवसांत रुग्णांचा रिपोर्ट कोरोना निगेटिव्ह आला. औषधाचे चांगले परिणाम पाहून सर्व रूग्णांना हे औषध देण्यास सुरुवात केली. त्यामुळे आज दीडशेहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.
हे औषध सौम्य कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांसाठी अधिक प्रभावी असल्याचे सिद्ध होत आहे. कारण, जर हे औषध सुरुवातीच्या टप्प्यात दिले गेले तर रुग्ण लवकर बरे होतो आणि त्याचा अहवाल निगेटिव्ह येतो. अत्यंत गंभीर रूग्णांवर औषधाचा प्रभाव कमी दिसतो. आतापर्यंत, कोरोना संसर्ग झालेल्या रूग्णांच्या उपचारादरम्यान हाय फ्लो ऑक्सिजन, स्टिरॉइड्स, व्हिटॅमिन सी आणि झिंक पूरक आहार देण्यात येत आहे. याशिवाय, इतर लक्षणांच्या आधारे कोरोना रुग्णांना औषधे दिली जात आहेत, असेही डॉक्टरांनी सांगितले.
आणखी बातम्या...
'आता तरी किंमत सांगा...', राफेलवरून दिग्विजय सिंहांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
रियाने सुशांतच्या अकाऊंटमधून एका महिन्यात १५ कोटी काढले, वडिलांचा गंभीर आरोप
लडाखच्या पँगोंग-गोगरामध्ये अद्याप चीनची माघार नाही, फिंगर भागातही परिस्थिती जैसे थे...
"१५ दिवसांत ज्योतिरादित्य शिंदे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होतील", मंत्र्याच्या वक्तव्याने खळबळ
राणेंवर बोलल्याशिवाय 'मातोश्री' बिस्कीट टाकत नाही असा समज, पण...; नितेश राणेंची बोचरी टीका
कोरोनापासून बचावासाठी डॉक्टरचा 'देसी जुगाड'; रुग्णांवर असा केला जातोय उपचार
अयोध्येतील राम मंदिरासाठी ५ कोटींची देणगी, प्रसिद्ध कथावाचक मोरारी बापूंची घोषणा
राफेलच्या स्वागतासाठी अंबाला हवाईतळावर जय्यत तयारी, ३ किमीचा परिसर ड्रोन झोन घोषित