शिवराज यादव -
मुंबई, दि. 28 - भारत - ऑस्ट्रेलिया सामन्यानंतर सोशल मिडियावर एकीकडे शुभेच्छांचा वर्षाव होत होता तर दुसरीकडे 'मौका मौका'चे उपहासात्मक व्हिडिओ टाकून हारलेल्या संघाला चिडवले जात होते. दोन्ही संघातील क्रिकेटरसिकांमध्ये अशा प्रकारे भिडणे हे तसं नेहमीचच झाले आहे. भारताचा बांगलादेशसोबत झालेला सामना असो वा पाकिस्तानशी.. दोन्ही सामन्यादरम्यान सोशल मिडियावर क्रिकेटरसिकांनी अक्षरक्ष: धुमाकूळ घातला होता. पण भारत - ऑस्ट्रेलिया सामन्यात बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांनीच उडी घेत इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी कप्तान अँड्र्यू फ्लिंटॉफला भिडले.
सामना सुरु असताना अँड्र्यू फ्लिंटॉफने 'विराट कोहली असाच खेळत राहिला तर एक दिवस जो रूट यांची बरोबरी करेल..पण फायनलमध्ये कोणता संघ इंग्लंडशी सामना करेल याची खात्री नाही', असं ट्विट केलं होतं. जो रूट हे इंग्लंडचे नावाजलेले बॅट्समन आहेत. अँड्र्यू फ्लिंटॉफने केलेलं हे ट्विट अमिताभ बच्चन यांना कदाचित आवडलं नाही . आणि त्यांनी 'कोण रुट ? मुळापासून उखडून टाकू', असं उत्तर ट्विटवरुन दिलं.
मात्र अँड्र्यू फ्लिंटॉफने परत मुद्दामून चिडवण्याच्या हेतूने अमिताभ बच्चन यांना आपण कोण ? विचारलं. त्यानंतर रवींद्र जाडेजाने या ट्विटर वॉरमध्ये उडी घेत बॉलीवूड स्टाईलमध्ये अमिताभ बच्चन यांची ओळख करुन दिली. 'बेटा फ्लिंटॉफ.. रिश्ते मे वो तुम्हारे भी बाप लगते है, नाम है शेहनशाह' असं ट्विट करत जाडेजाने अमिताभ बच्चन यांची ओळख करुन दिली. या ट्विटमध्ये फ्लिंटॉफला त्याच्या फॉलोअर्सची आणि अमिताभ बच्चन यांच्या फॉलोअर्सची संख्या दाखवत जाडेजाने त्याची जागा दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
@flintoff11@imVkohli@root66@englandcricket Root who ? जड़ से उखाड़ देंगे Root ko ..!!!— Amitabh Bachchan (@SrBachchan) March 27, 2016
Beta @flintoff11,"Rishtey Me To Wo Tumhare Baap Lagtey Hain, Naam Hai Shahenshaah". ;) @SrBachchan#IndvsAuspic.twitter.com/r4dKZjV2YX— Sir Ravindra Jadeja (@SirJadeja) March 27, 2016