शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

जगबुडीची 22भाकिते

By admin | Published: October 12, 2015 10:42 PM

ई-बायबल फेलोशिप या ख्रिश्चन गटाने सात आॅक्टोबर २०१५ रोजी जगबुडी होणार असल्याचे भाकीत केले होते. ते खरे ठरले नाही. तथापि, असे भाकीत केले जाण्याची ही पहिली वेळ नाही.

ई-बायबल फेलोशिप या ख्रिश्चन गटाने सात आॅक्टोबर २०१५ रोजी जगबुडी होणार असल्याचे भाकीत केले होते. ते खरे ठरले नाही. तथापि, असे भाकीत केले जाण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी २२ वेळा अशी भाकिते करण्यात आली होती आणि अर्थातच ती खोटी ठरली. या भाकितांवर एक नजर टाकू यात.स्तंभलेखक व इस्लामी कार्यकर्ते टॅनेट्टा मोहंमद यांनी २००१ मध्ये जगबुडीचे भाकीत केले होते. २००१ मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला. या हल्ल्याने त्यांच्या भाकीताच्या वैधतेवर काही प्रमाणात शिक्कामोर्तब झाले; परंतु त्यांच्या दाव्याप्रमाणे परग्रहावरील तबकड्या दिसल्या नाहीत की जगही बुडाले नाही. गेल्या फेब्रुवारीत त्यांचा मृत्यू झाला. जपानमधील ओम शिन्रीक्यो या पंथाचे नेते शोको असाहारा यांनी जपान व अमेरिकेत युद्ध होऊन १९९७ मध्ये कधीतरी जगाचा विनाश होईल, असे भाकीत केले होते. या पंथाने पुढे टोकियो मेट्रोवर सरीन गॅसचा हल्ला करून १३ जणांचा बळी घेतला होता. या प्रकरणी असाहाराला २००४ मध्ये मृत्युदंड ठोठावण्यात आला. १२४८ मध्ये जन्मलेले फ्रान्समधील प्राच्यविद्यापंडित पीटर ओलिव्ही यांनी १३ व्या शतकात ख्रिस्तविरोधी लोक सत्तेवर येऊन २००० मध्ये जगाचा अंत होईल, अशी भविष्यवाणी केली होती. सर्व ग्रह एका रांगेत येतील व ५ मे २००० रोजी सूर्याकडे खेचले जातील, असे भाकीत ड्विाईट यॉर्क यांनी १९६० मध्ये स्थापन केलेल्या नुवाउबायन मूव्हमेंट या संघटनेने केले होते. कुख्यात धर्मगुरू आणि रशियन राजघराण्याचे सल्लागार ग्रिगोरी रासपुतीन यांनी २३ आॅगस्ट २०१३ रोजी विध्वंसक आग पृथ्वीवरील सर्व जीवन संपुष्टात आणेल व प्रभू येशू पुन्हा पृथ्वीवर येतील, अशी भविष्यवाणी केली होती. १७ व्या शतकाच्या मध्यात आयर्लंडचे आर्चबिशप जेम्स उसेर यांनी पृथ्वीच्या जन्मापासून ६ हजार वर्षांनी विनाश होईल, असे भाकीत केले होते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ही तारीख २३ आॅक्टोबर १९९७ ठरते; मात्र १९९७ ला जन्मलेली मुले आज तरुण झाली असून पृथ्वीवरील जीवनाचा आनंद लुटत आहेत. -------सगळे दावे पूर्णत: बोगस : जगाच्या व्यवहाराला थांबणे माहीत नाही

मार्क ब्लिट्झ यांनी २००८ मध्ये ब्लडमूनच्या (सलग चार खग्रास चंद्रगहणे) वेळी जग बुडेल, असे भाकीत केले होते. त्यानंतर जॉन हागी यांनीही २०१४ मध्ये असेच भाकीत केले होते. २०१४ व २०१५ मध्ये सलग चार चंद्रगहणे असून हा पृथ्वीवरील चराचराच्या अंताचा काळ असल्याचे या दोघा ख्रिश्चन धर्मगुरुंनी म्हटले होते. वायटूके या संगणकीय समस्येमुळे जागतिक स्तरावर आर्थिक गोंधळ माजेल व अराजकी लोक सत्ता मिळविण्यासाठी याचा गैरफायदा घेतील व त्यातून विनाशकारी संकट उद्भवेल, असे भाकीत टीम लाहाये आणि जेरी बी जेनकीन्स यांनी केले होते. मात्र, १ जानेवारी २००० ही तारीख जवळ येताच या दोघांनी आपले मत बदलले.एखादा लघुग्रह किंवा महाकाय उल्कापिंड आपल्या सौरमालेत येईल आणि त्यामुळे पृथ्वीचे धु्रव बदलून मानव प्रजातीचा विनाश होईल, असे भाकीत नॅन्सी लेईडर यांनी मे २००३ मध्ये केले होते. अमेरिकन माध्यमसम्राट पॅट रॉबर्टसन यांनी १९७६ मध्ये जगबुडीचे भाकीत करताना आॅक्टोबर किंवा नोव्हेंबर १९८२ दरम्यान कधीही जगाचा नाश होईल, असे म्हटले होते. हॅरॉल्ड कॅम्पिंग यांनी २१ मे २०११ रोजी पृथ्वीच्या विनाशाचे भाकीत केले होते. ते खोटे ठरल्यानंतर त्यांनी तारखेत दुरुस्ती करत २१ आॅक्टोबर २०११ रोजी हे घडून येईल, असे म्हटले होते. बायबलच्या आधारे त्यांनी हे भाकीत केले होते; मात्र त्यांची दोन्ही भाकिते खोटी ठरली.फिलाडेल्फियातील ख्रिश्चनांची आॅनलाईन धर्मसभा असलेल्या ई-बायबल फेलोशिपचे संस्थापक ख्रिस मॅक्कॅन यांनी ६ आॅक्टोबर २०१५ रोजी पृथ्वीचा विनाश होईल, असे भाकीत केले होते. मी कदाचित चूक असेन, असेही त्यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटले होते. माया संस्कृतीच्या दिनदर्शिकेत १२ डिसेंबर २०१२ हा अखेरचा दिवस आहे. त्यापुढे दिनदर्शिकेत उल्लेख नाही. त्यामुळे १२ डिसेंबर २०१२ रोजी किंवा त्या काळात महाविध्वंसक घटना घडून येतील, असे भाकीत करण्यात आले होते. या भाकितावर आधारित २०१२ हा थरारक चित्रपटही तेव्हा गाजला. मात्र, २०१२ चे भाकीत सत्यात उतरले नाही. १६ आॅक्टोबर २०११ रोजी एलेनिन हा धूमकेतू आदळून पृथ्वीचा सर्वनाश होईल, असे भाकीत अनेकांनी केले होते. पृथ्वी व सूर्य यांच्यामधून प्रवास करत असलेल्या या धूमकेतूमुळे आॅगस्ट ते आॅक्टोबर २०११ दरम्यान पृथ्वीवर भूकंप व त्सुनामीची महाअरिष्टे कोसळतील, अशी भीती लोकांना तेव्हा वाटली. १९८० मध्ये ख्रिश्चन साध्वी एलिझाबेथ क्लेअर यांनी सोव्हियत युनियन (आताचा रशिया) अमेरिकेवर अणुहल्ला करेल, असे भाकीत केले होते. लेखक जेरॉन क्रिसवेल कोनिग यांनी त्यांच्या ‘क्रिसवेल प्रेडिक्टस् : फ्रॉम नाऊ टू द इयर २०००’ या पुस्तकात डेनव्हरवर अवकाशातून एक घातक किरण आदळून सर्व धातू रबरात रूपांतरित होतील, असे भाकीत केले होते. एवढेच नाही तर १८ आॅगस्ट १९९९ रोजी जगाचा शेवट होईल, असेही त्यांनी म्हटले होते. दुर्दैवाने आपण चूक होतो की बरोबर हे त्यांना कधीही समजू शकणार नाही. कारण, १९८२ मध्येच त्यांचे निधन झाले. इंग्लंडमधील जोन्ना साऊथकॉट या महिलेने आपण १९ आॅक्टोबर १८१४ मध्ये नव्या मसिहाला जन्म देणार असल्याचे घोषित केले होते. मात्र, ही दैवी घटना घडून आली नाही व त्यानंतर जोन्नाचा लगेचच मृत्यू झाला.