नवी दिल्ली - आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांच्या अडचणी कमी होण्याचं नाव घेत नाही ये. सत्तेत असताना नायडू यांनी बनविलेल्या प्रजा वेदिका इमारतीवर वायएसआर काँग्रेस प्रमुख आणि मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी बुडलडोजर फिरवले. त्यानंतर नायडू यांच्या निवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून वाद निर्माण झाला आणि आता त्यांना त्यांचे सध्याचे निवासस्थान रिक्त करण्यासाठी आंध्र प्रदेश शहर विकास प्राधिकरणने नोटीस बजावली आहे. त्यामुळे चंद्रबाबू नायडू यांची डोकेदुखी वाढली आहे.
चंद्राबाबू नायडू यांच्या अडचणी पुन्हा वाढताना दिसत आहे. आधी त्यांनी बनवलेल्या इमारतीवर बुडलडोजर फिरवण्यात आले. आणि आता तर त्यांना त्यांचे सध्याचे निवासस्थान रिक्त करण्यासाठी आंध्र प्रदेश शहर विकास प्राधिकरणने नोटीस बजावली आहे. कृष्णा नदीकाठी घरांची विनापरवाना निर्माण करण्यात आले आहे. यामुळे नदी संवर्धन कायद्याचे उल्लंघन होत आहे. त्यामुळे ह्या नोटीस देण्यात आल्या असल्याचा सांगण्यात येत आहे. तसेच सात दिवसाच्या आत नोटीसला उत्तर दिले नाहीतर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा सुद्धा विकास प्राधिकरणाच्या वतीने देण्यात आला आहे.
आंध्र प्रदेशात विधानसभा निवडणुकीत टीडीपीचा दारूण पराभव झाला. त्या पक्षाचे केवळ २३ उमेदवारच विधानसभेवर निवडून आले आहेत.चंद्राबाबू नायडू राज्यातील विधानसभेत विरोधी पक्षनेते आहेत. तेलगू देसम आमदारांच्या बैठकीत त्यांची नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली होती.