आई-मुलीचं नातं खूप अनमोल असतं. मुलीच्या यशात वडिलांसोबत आईचाही मोठा हात आहे. उत्तर प्रदेश केडरच्या आयएएस जागृती अवस्थी आणि त्यांची शिक्षिका असलेली आई मधुलता अवस्थी यांच्यातील नातंही असंच खास आहे. मधुलता यांनी आपल्या मुलीच्या करिअरसाठी नोकरी सोडली होती.
IAS जागृती अवस्थी या मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत. त्य़ा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. इंजिनिअर असलेल्या जागृती यांनी यूपीएससी परीक्षेत दुसऱ्या प्रयत्नात यश संपादन केलं होतं. यामध्ये त्यांच्या आई-वडिलांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या तयारीच्या वेळी त्यांच्या घरातील टीव्हीही चालू नव्हता.
नोकरी लागल्यावर आई-वडिलांनी नोकरीची जागा पाहावी, अशी प्रत्येकाची इच्छा असते. आयएएस जागृती अवस्थी यांना ही संधी मिळाली आणि त्यांनी आपल्या आईला मेरठ येथील कार्यालयात नेले. त्यांनी सोशल मीडियावर आपल्या फॉलोअर्ससोबत आपला हा आनंदही शेअर केला आहे.
IAS जागृती अवस्थीच्या या फोटोत त्यांची आई खुर्चीवर बसलेली दिसत आहे. जागृती यांचे इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साइटवर 1 लाख 36 हजार फॉलोअर्स आहेत. आई आणि मुलीचा हा व्हायरल फोटो आतापर्यंत 68 हजारांहून अधिक युजर्सनी लाइक केला आहे. त्याचबरोबर 600 हून अधिक लोकांनी यावर कमेंटही केल्या आहेत. प्रत्येकजण याला एका खास स्वप्नाची पूर्तता म्हणत आहे.
जागृती अवस्थी यांनी मौलाना आझाद नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MANIT), भोपाळ येथून इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. यानंतर, त्यांनी काही काळ भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये काम केलं आणि नंतर यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्याच प्रयत्नात अपयश आल्यानंतरही हार मानली नाही. अखेरीस 2020 च्या परीक्षेत त्या सेकंड रँकसह टॉपर झाल्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.