ऑनलाइन लोकमत -
श्रीनगर, दि. 11 - जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत सुरु असलेल्या चकमकीत एक जवान शहीद झाला आहे. हंडवारा जिल्ह्यात ही चकमक सुरु आहे. रात्रीपासून सुरु असलेली ही चकमक अद्यापही सुरु आहे. हंडवारा परिसरातील जंगलात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने दहशतवादी विरोधी ऑपरेशन सुरु केलं होतं.
चकमकीदरम्यान जखमी झालेल्या जवानाला जम्मूमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक होण्याची या महिन्यातील ही तिसरी घटना आहे.
हरकत-उल-मुजाहिद्दीनचे दहशतवाही हंडवारामधील जंगलात लपले असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानंतर लष्कराने कारवाईला सुरुवात केली होती. मंगळवारी रात्री सुरु झालेली हा चकमक अजूनपर्यंत सुरु आहे. लष्कराने गेल्या 3 महिन्यांपासून दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी काश्मीर खो-यात मोहिम आखली आहे.
J&K:Encounter between security forces & terrorists underway in Rajwar,Handwara(Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/MLte8Cbj9W— ANI (@ANI_news) May 11, 2016