नवी दिल्ली: जहांगीरपुरी येथे हनुमान जयंतीच्या दिवशी निघालेल्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर(Jahangirpuri Violence) उत्तर दिल्ली महानगरपालिकेने परिसरातील बेकायदा बांधकामे पाडण्याची मोहीम (Jahangirpuri Demolition) सुरू केली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बुलडोझर चालवण्याची कारवाई थांबवण्यात आली. मात्र, त्याआधीच बुलडोझरने अनेक बांधकामे जमीनदोस्त केली होती. या मुद्द्यावरून राजकारणा चांगलेच तापले असून, आज याविरोधात जेएनयू आणि जामियामध्ये निदर्शने होणार आहेत. दरम्यान, आज सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.
काँग्रेस-तृणमूलचा कारवाईला विरोधऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (AIMIM) चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी या कारवाईतील पीडित लोकांना भेटण्यासाठी जहांगीरपुरी येथे पोहोचले होते, मात्र त्यांना सुरक्षा कर्मचाऱ्यांनी रोखले. त्यानंतर आता काँग्रेस (Congress), तृणमूल काँग्रेस (TMC) यांनीही त्यांच्या नेत्यांचे शिष्टमंडळ जहांगीरपुरीला पाठवण्याची घोषणा केली आहे. याशिवाय, डावी विद्यार्थी संघटना ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA), काँग्रेसची विद्यार्थी संघटना, नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) यांनी एमसीडीच्या या कृतीविरोधात आंदोलन पुकारले आहे.
जामिया आणि JNU मध्ये आंदोलनAISA ने आज दुपारी 2 वाजता जामिया येथे आंदोलनाची घोषणा केली आहे. देशभरात मुस्लिमांवर होत असलेले अत्याचार, अन्याय, जहांगीरपुरीतील गरिबांच्या घरांवर, दुकानांवर आणि प्रार्थनास्थळांवर बुलडोझर चालवल्या जात असल्याच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचेही एनएसयूआयने म्हटले आहे. NSUI च्या JNU युनिटने आज म्हणजेच 21 एप्रिल रोजी गंगा ढाबा ते साबरमतीपर्यंत आंदोलन पुकारले आहे.
काँग्रेस-तृणमूलचे शिष्टमंडळ जहांगीरपुरीला जाणार 15 काँग्रेस नेत्यांचे शिष्टमंडळ जहांगीरपुरीच्या बाधित भागात जाणार आहे. काँग्रेसच्या या शिष्टमंडळात अनिल चौधरी, शक्ती सिंह गोहिल, अजय माकन तसेच सुभाष चोप्रा, हारून युसूफ, देवेंद्र यादव, इम्रान प्रतापगढ़ी आणि कृष्णा तीरथ यांचा समावेश आहे. याशिवाय,टीएमसीचेही 5 खासदारांचे शिष्टमंडळ जहांगीरपुरीला जाणार आहे. दुसरीकडे, सीपीआयएम (CPIM) नेत्या वृंदा करात यांनी जहांगीरपुरीच्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.