शहरं
Join us  
Trending Stories
1
बंडखोर ऐकेनात, मनधरणीसाठी महायुतीच्या नेत्यांचा कस; माघारीसाठी काय रणनीती?
2
विधान परिषद, महामंडळ देतो; अर्ज मागे घ्या... मविआत बंडोबांना थंड करण्याचे प्रयत्न!
3
अयोध्येत २५ लाख दीपोत्सवाचा विश्वविक्रम... १,१२१ जणांनी एकाच वेळी केली आरती 
4
सोने लक्ष्मीपूजनापूर्वीच प्रथमच गेले ८० हजारांवर; चांदीनेही खाल्ला भाव
5
"डाेनाल्ड ट्रम्प अस्थिर, प्रतिशोधाने पछाडलेले...", शेवटच्या भाषणात कमला हॅरिस यांचा हल्लाबोल
6
इस्रायलचा हल्ला, गाझात ८८ जण ठार; अन्न, पाण्यासह औषधांचीही चणचण
7
स्वदेशी संस्थांनी केली ४.६ लाख कोटींची गुंतवणूक, शेअर बाजारात सार्वकालिक उच्चांक
8
पोलिसांनी एसी, कॉम्प्युटर, टीव्ही फुकट घेतले; पैसे मागितल्यानंतर वापरलेल्या वस्तू केल्या परत 
9
दोन ठिकाणांवरील भारत, चीन सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण
10
भाजप बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला 
11
विराटला लग्नासाठी प्रपोज करणाऱ्या इंग्लिश खेळाडूची RCB मध्ये एन्ट्री; चाहत्यांनी घेतली फिरकी
12
'...तर अजित पवार पुन्हा विचार करतील'; नवाब मलिकांबद्दल शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय?
13
Shubman Gill कमी पगारात मोठी जबाबदारी घ्यायला झालाय 'राजी'; जाणून घ्या त्यामागचं कारण
14
'सचिन तेंडुलकर फाऊंडेशन'सोबत 'क्रिकेटच्या देवा'ची दिवाळी; साराने शेअर केली झलक, Photos
15
"एका जातीवर कुणीच निवडून येऊ शकत नाही, त्यासाठी दलित, मुस्लीम अन् मराठा..."
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
17
“तुमच्याकडे वडील म्हणून पाहतो आणि तुम्ही...”; अजित पवारांच्या आरोपांवर आर आर पाटलांच्या कन्येचं प्रत्युत्तर
18
त्यांना दिवसातून तीनदा मीच का दिसतो? फडणवीसांचा सवाल; जरांगे पाटलांनीही दिलं प्रत्युत्तर!
19
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
20
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!

 "सरकारला हिंसाचार घडवायचा होता, पोलीस तमाशा बघायला बसले होते", असदुद्दीन ओवेसींचा हल्लाबोल 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 5:51 PM

Jahangirpuri Violence : सर्व काही सरकारसमोर घडत आहे, ज्याची संपूर्ण जबाबदारी मोदी सरकारवर येते. दोन मिरवणुका शांततेत काढल्या, तिसर्‍या मिरवणुकीत हे सगळं कसं घडलं? असा सवाल करत असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. 

नवी दिल्ली : जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणावरून एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी सोमवारी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी, आज खुद्द दिल्ली पोलिस आयुक्तांनी जहांगीरपुरीमध्ये काढलेली मिरवणूक परवानगीशिवाय काढण्यात आल्याचे सांगितले आहे. मिरवणूक काढली जात असताना पोलीस काय करत होते? पोलीस तमाशा बघायला बसले होते? मिरवणुकीत शस्त्रांची काय गरज होती? लोकांच्या हातात पिस्तूल होते. तलवार आणि चाकू असणे धार्मिक आहे का? तसेच विविध प्रक्षोभक घोषणाबाजी करण्यात आली, असे असदुद्दीन ओवेसी म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. 

जातीय हिंसाचार तेव्हाच होतो जेव्हा सरकारला हवे असते, सरकारची इच्छा नसते तेव्हा होत नाही. त्यामुळे इथेही सरकारने जातीय हिंसाचार घडू दिला. सर्व काही सरकारसमोर घडत आहे, ज्याची संपूर्ण जबाबदारी मोदी सरकारवर येते. दोन मिरवणुका शांततेत काढल्या, तिसर्‍या मिरवणुकीत हे सगळं कसं घडलं? असा सवाल करत असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. 

याचबरोबर, दिल्ली पोलिसांच्या अटकेवरही असदुद्दीन ओवेसींनी प्रश्न उपस्थित केले आहेत.  ते म्हणाले, "अन्सार नावाची व्यक्ती, ज्याचा व्हिडिओ समोर आला आहे. तो एका मुलाला समजावून सांगत आहे की त्याला का अटक करण्यात आली. पोलीस एकतर्फी कारवाई करत आहेत. अन्सारचे जे हिंदू शेजारी आहेत, ते स्वतःच त्याच्या चारित्र्याची स्तुती करत आहेत. अन्सार दंगलीवर नियंत्रण ठेवत होता." याशिवाय,  असदुद्दीन ओवेसींनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केला. ते म्हणाले, "दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी मुस्लिमांवरच आरोप केले आहेत. ते निवडणुकीत मुस्लिमांचे हित साधतात आणि आता असे बोलत आहेत." 

मी दिल्ली सरकार आणि मोदी सरकारवर आरोप करत आहे. एकतर्फी कारवाई केली जात आहे. मशिदीसमोर झेंडे लावले जातात, तो व्हिडिओ कोणी का दाखवत नाही. तुम्ही निवडक कायदा लागू करत आहात. दिल्लीची कायदा आणि सुव्यवस्था केंद्र सरकारच्या अखत्यारीत येते, असे असदुद्दीन ओवेसींनी सांगितले. तर दिल्ली पोलिसांवर आरोप करताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, 'तुमचे अपयश लपवण्यासाठी किमान खोटे बोलू नका.'

नेमक काय घडलं?जहांगीरपुरी येथे शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान दोन समुदायांमध्ये दगडफेक आणि जाळपोळ झाल्याच्या घटना घडल्या. त्यात एका स्थानिक व्यक्तीसह आठ पोलीस कर्मचारी जखमी झाले. यादरम्यान एका पोलिसाला गोळीही लागली. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 23 आरोपींना अटक केली असून आणखीही काही जणांना अटक होणार आहे. एवढेच नाही तर पोलिसांनी बंदुका आणि दारूगोळाही जप्त केला आहे.

शनिवारच्या हिंसाचारानंतर पोलीस एका महिलेला चौकशीसाठी घेऊन गेले होते, असे सांगण्यात येत आहे. यानंतर सोमवारी जहांगीरपुरी परिसरातील सुमारे 50 महिलांनी निषेध आणि दगडफेक सुरू केली. पोलिसांनी ज्या महिलेला ताब्यात घेतले आहे, ती आरोपी सोनूची पत्नी असल्याचे सांगितले जात आहे. सोनूने शनिवारी गोळीबार केला होता. महिलेला पोलीस चौकशीसाठी नेल्यानंतर सोमवारी वेगवेगळ्या घरांच्या छतावरुन पोलीस पथकावर दगडफेक करण्यात आली.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीdelhiदिल्ली