Delhi Jahangirpuri Violence: 16 एप्रिल रोजी दिल्लीतील जहांगीरपुरी परिसरातझालेल्या हिंसाचार प्रकरणात दिल्लीपोलिसांनी आणखी 5 जणांना अटक केली. यामध्ये एक अल्पवयीन देखील आहे. विशेष म्हणजे, अटक केलेले सर्व लोक एकाच कुटुंबातील आहेत. याप्रकरणी आतापर्यंत 23 जणांना अटक करण्यात आली आहे.
दोन्ही समाजातील लोकांना अटक केलीहिंसाचारप्रकरणी दिल्ली पोलिसांनी दोन्ही समुदायातील लोकांना अटक केली आहे. सुकेन सरकार, त्याचा भाऊ सुरेश सरकार, सुकेनची दोन मुले नीरज आणि सूरज आणि सुकेनचा मेहुणा सुजित अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सुकेन याच्या अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची सध्या चौकशी सुरू आहे.
मिरवणुकीवर गोळीबार करणारा ताब्यातयापूर्वीच दिल्ली पोलिसांनी हिंसाचारादरम्यान गोळीबार करणाऱ्या अस्लम उर्फ सोनू याला अटक केली आहे. त्याच्या गोळीबारात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता. पोलिसांनी त्याच्याकडून एक पिस्तूलही जप्त केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 23 आरोपींना अटक केली असून आणखीही काही जणांना अटक होणार आहे. एवढेच नाही तर पोलिसांनी बंदुका आणि दारूगोळाही जप्त केला आहे.
शनिवारी नेमके काय झाले?शनिवारी नवी दिल्लीतील जहांगीरपुरमध्ये हनुमान जन्मोत्सवानिमित्त निघालेल्या मिरवणुकीदरम्यान दोन समाजाचे लोक आमनेसामने आले. वातावरण इतके बिघडले की, वादाचे रुपांतर दंगलीत झाले. जहांगीरपुरीच्या कुशल सिनेमाजवळून हनुमान जयंतीची मिरवणूक जात असताना हा गोंधळ झाला. हिंसाचारादरम्यान अनेक वाहनांना आग लावण्यात आली. दगडफेक करणाऱ्या जमावाच्या हातात काठ्या आणि तलवारीही दिसत होत्या. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हिंसाचारात 6 पोलिसांसह 7 जण जखमी झाले आहेत.