शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

जय बजरंगबली, काँग्रेसच..., कर्नाटकमध्ये 34 वर्षांनंतर उत्तुंग यश; ‘४० टक्के कमिशनवाली सरकार’ मुद्दा ठरला प्रभावी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2023 6:11 AM

‘बजरंगबली’ काँग्रेसवर प्रसन्न होते व विजयामुळे हा पक्ष बाहुबली ठरला, असे चित्र या निवडणूक निकालांतून दिसून आले. या राज्यात काँग्रेसने तब्बल १० वर्षांनी स्वबळावर सत्ता मिळविली आहे. 

बंगळुरू : कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी १० मे रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने १३६ जागा जिंकून भाजपचा दारूण पराभव केला तर भाजपला अवघ्या ६५ जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकांत बजरंग दलावरील बंदीबाबतचा प्रचारात गाजलेला मुद्दा भाजपला तारू शकला नाही. ‘बजरंगबली’ काँग्रेसवर प्रसन्न होते व विजयामुळे हा पक्ष बाहुबली ठरला, असे चित्र या निवडणूक निकालांतून दिसून आले. या राज्यात काँग्रेसने तब्बल १० वर्षांनी स्वबळावर सत्ता मिळविली आहे. 

बजरंगबलीचा नारा देऊन मतदान करावे व काँग्रेसला धडा शिकवावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते; पण, त्या पक्षाला हनुमानाने तारले नाही. कर्नाटकच्या मतदारांना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा अधिक भावल्याचे निवडणूक निकालांतून दिसून आले. सलग एकाच पक्षाकडे सत्ता न सोपविण्याची कर्नाटकातील सुमारे ३८ वर्षे जुनी परंपरा या निवडणुकांतही कायम राहिली. कर्नाटकमधील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अभिनंदन केले आहे. भाजप जनतेच्या कल्याणासाठी यापुढे अधिक जोमाने काम करेल, असे त्यांनी म्हटले आहे. 

बजरंग दलाचा मुद्दा कुचकामीबजरंग दल, पीएफआयसारख्या विद्वेष पसरविणाऱ्या संघटनांवर बंदी घालण्याचा विचार काँग्रेसने जाहीरनाम्यात व्यक्त केला होता. त्या मुद्द्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व नेत्यांनी भांडवल करून प्रचारात काँग्रेसवर टीकेची झोड उठविली. मात्र, बजरंग दलाचा हा मुद्दा अजिबात प्रभावी न ठरल्याचे निवडणूक निकालांतून दिसून आले.

हिमाचल प्रदेशनंतर कर्नाटकही गेलेगेल्या डिसेंबर महिन्यात हिमाचल प्रदेशमध्ये झालेल्या निवडणुकांत भाजपचा पराभव झाला होता. त्यानंतर आता कर्नाटकमध्ये भाजपला सत्ता गमवावी लागली. दक्षिण भारतात भाजपची सत्ता असलेले एकमेव राज्य त्या पक्षाला गमवावे लागले आहे. 

सीमावर्ती भागातही काँग्रेस -महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील बेळगाव,  विजयपूर, कलबुर्गी, बिदर आणि बागलकोट या पाच जिल्ह्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. महाराष्ट्र एकीकरण समितीनेही या निवडणुकीत चांगलाच जोर लावला, मात्र त्यांना फार काही प्रभावी कामगिरी करता आली नाही. यंदाच्या निवडणुकीत या भागातील मतदारांनी भाजपला नाकारले असून कॉंग्रेसने गतवर्षीच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. 

-  बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील १८ पैकी ११ विधानसभा मतदारसंघांत कॉंग्रेसने मुसंडी मारली, तर भाजपला सात जागांवर समाधान मानावे लागले.  -  विजयपूर : विजयपूर जिल्ह्यातील ८ पैकी सहा जागांवर कॉंग्रेसने बाजी मारली, तर भाजप आणि जेडीएसला प्रत्येकी एका जागेवर समाधान मानावे लागले. -  बागलकोट : ‘एज्युकेशन हब’असलेल्या बागलकोट जिल्ह्यातील ७ पैकी ५ जागा काँग्रेसने खिशात टाकल्या, भाजपला दोन जागी यश मिळाले. -  कलबुर्गी : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचे ‘होम ग्राउंड’असलेल्या कलबुर्गी जिल्ह्यात ८ पैकी ६ जागा कॉंग्रेसने जिंकल्या. भाजप आणि जेडीएसने प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. -  बिदर : बिदरमधील ६ पैकी चार जागांवर भाजप, तर दोन ठिकाणी कॉंग्रेस विजयी झाला. जेडीएसला बिदर जिल्ह्यात एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही.

जय-पराजयाची कारणे

काँग्रेस --  राहुल यांच्या भारत जोडो यात्रेने जिंकली मने-  ४० टक्के कमिशनवाले सरकार हा काँग्रेसने केलेला प्रभावी प्रचार-  काँग्रेसने राष्ट्रीय प्रश्नांपेक्षा दिला स्थानिक मुद्द्यांवर अधिक भर-  नेहमीच प्रबळ असलेला प्रस्थापितविरोधी प्रवाह यावेळीही कामी आला

भाजप --  शिक्षणसंस्थांमधील हिजाबबंदी, ४ टक्के मुस्लीम आरक्षण रद्द करण्याचा निर्णय हे राजकीयदृष्ट्या भाजपला महागात पडले-  मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे प्रभावी नसल्याची सातत्याने होत असलेली टीका-  भाजपने तिकीट नाकारलेले जगदीश शेट्टर तसेच काही नेते पक्षातून बाहेर पडले. त्या घटनाही पराभवास कारणीभूत. 

टॅग्स :Karnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीElectionनिवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदी