शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
3
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
4
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
5
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
6
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
7
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
8
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
9
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
10
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
11
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
12
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
13
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
14
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
15
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
16
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?
17
ही किती जाड आहे! सिनेमातील बिकिनी सीनमुळे लोकांनी केलं ट्रोल, अभिनेत्री म्हणते- "दिग्दर्शकाने जे कपडे..."
18
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
19
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
20
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट

जय श्रीराम ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राममंदिराचे भूमिपूजन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2020 6:33 AM

पंतप्रधान मोदी दुपारी सव्वाबारा वाजता मंदिराचे भूमिपूजन करतील

अयोध्या - केवळ देशातील नव्हे, तर जगभरातील कोट्यवधी रामभक्त गेली अनेक वर्षे जे स्वप्न पाहत होते, त्या राम मंदिराच्या स्वप्नाची पूर्ती बुधवारी होत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे दिमाखदार सोहळ्यात भूमिपूजन होणार आहे. त्यासाठी अयोध्यानगरी आणि शहरातील प्रत्येक जण सज्ज व अतिशय उत्सुक आहे. कार्यक्रमाला जेमतेम १७५ संत, महंत व विविध धर्मांतील मान्यवर उपस्थित राहणार असले तरी हा सोहळा सर्वांना दूरदर्शनवरून थेट पाहता येणार आहे.पंतप्रधान मोदी दुपारी सव्वाबारा वाजता मंदिराचे भूमिपूजन करतील. त्याआधी ते हनुमानगढीला भेट देणार असून, रामलल्ला विराजमानचेही दर्शन घेणार आहेत. देशात बहुधा प्रथमच एखाद्या पंतप्रधानांच्या हस्ते मंदिराच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन होतं असल्याने रामभक्त आणि श्रद्धाळू अत्यंत आनंदात आहेत. अयोध्येत ५ आॅगस्टला दिवाळी असेल, असे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात शहरात दीपोत्सव, रांगोळ्या, सर्वत्र सजावट, पूजाअर्चा, आरत्या, शंखनाद, फुलांच्या झळकणाऱ्या माळा यांमुळे प्रत्यक्ष दिवाळी सुरू झाल्याचेच भासत आहे. प्रत्येक जण एकमेकांचे स्वागत जय श्रीरामच्या घोषणेने करीत आहे.

श्रीराम १४ वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येलापरत आले, तेव्हा ही नगरी जशी सजली होती,तसेच चित्र शहरात आहे. भगवे झेंडे, पताकाआणि घराबाहेर अनेकांनी उभारलेल्या गुढ्यापाहून सण-उत्सवाची ही तयारी दिसत आहे.श्रीराम पुन्हा एकवार आमच्या शहरात येतअसल्याने हा आमच्यासाठी सण आहे आणियापुढे दरवर्षी ५ आॅगस्टला आम्ही तो साजराकरू, असे अनेकांनी सांगितले.जय श्रीरामसाडेतीन वर्षांत पूर्णपणेतयार होईल राममंदिरमंदिर निर्माणासाठी अंदाजे३०० कोटी रुपये खर्चनिधी गोळा करण्यासाठी देशभरातील तब्बल १० कोटी कुटुंबांशी संपर्क साधणारजगातल्या तिसºया क्रमांकाचे हेमंदिर नेमके कसे असेल?श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राने श्रीरामाच्या प्रस्तावित मंदिराची प्रतिकृती जारी केली. श्रीरामाचे मंदिर हे असे भव्य असणार आहे.मजली असेलमंदिर. पूर्वीच्या आराखड्यानुसार ते दोन मजली असणार होते.फूट असेलउंची. आधीच्या आराखड्यात ती १२८ फूट होती.कळस मंदिराला असतील. पूर्वी ते तीन असणारहोते.असा असेल मोदींचा दौरा0९.३५ । दिल्लीतून विशेष विमानाने मोदी निघणार१०.३५ । लखनऊ विमानतळावर होणार लँडिंग१०.४० । हेलिकॉप्टरने अयोध्यासाठी प्रस्थान करणार११.३० । अयोध्या येथील साकेत कॉलेजच्या हेलिपॅडवर करणार लँडिंग१२.०० । रामजन्मभूमी परिसरात पोहोचणार. त्यानंतर दहा मिनिटात रामलल्लाचं दर्शन घेणार. पूजन करणार.१२.१५ । रामलल्ला परिसरात पारिजातच्या झाडाचं रोप लावणार१२.३० । भूमिपूजन सुरू होणार१२.४० । राममंदिराची आधारशिला स्थापन करणार०१.१० । नृत्यगोपालदास वेदांती यांच्यासह ट्रस्ट कमिटीची भेट घेणार०२.०५ । साकेलहेलिपॅडकडे रवाना होणार०२.२० । हेलिकॉप्टरने लखनऊकडे प्रस्थान करणार

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिर