मदुराई : जल्लीकट्टूवरील सर्वोच्च न्यायालयाच्या बंदीचे उल्लंघन करीत तरुणांच्या एका गटाने शुक्रवारी बैलांना काबूत करण्याच्या या खेळाचे आयोजन केले. तामिळनाडूत पोंगल सणानिमित्त हा थरारक खेळ खेळला जातो. एका गावातील खुल्या मैदानात या खेळाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने जलीकट्टूवर बंदी घातल्याने केंद्र सरकारने वटहुकूम काढून त्यास परवानगी द्यावी, अशी मागणी तामिळनाडू सरकार व सर्व राजकीय पक्षांनी केली होती. मात्र केंद्राने वटहुकूम काढण्यास नकार दिला आहे. दरम्यान पोंगल व संक्रांतीच्या निमित्ताने प्राण्यांशी संबंधित होणाऱ्या खेळांवर बंदी कायम राहणार आहे. आंध्र प्रदेशात कोंबड्यांच्या झुंजींवर बंदी आहे. नव्याने ती पुन्हा घालावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
जलीकट्टू, कोंबड्यांच्या झुंजी, मांजा यावर बंदी कायम
By admin | Published: January 14, 2017 1:50 AM