शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: काटेवाडीत पाडवा का साजरा करणार? अजित पवारांनी कारणच सांगितलं, म्हणाले...
2
जरांगेंच्या यादीला ओबीसींची यादी तयार, जो तो उठतोय त्यांनाच भेटायला जातोय; लक्ष्मण हाकेंनी रणशिंग फुंकले
3
Share Market Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगला शेअर बाजारात जोरदार खरेदी; Sensex-Nifty मध्ये तुफान तेजी
4
पोस्टर'वार'! योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला अखिलेश यादवांकडून पलटवार
5
भीषण! पाकिस्तानमध्ये मोठा बॉम्बस्फोट; ५ शाळकरी मुलं आणि एका पोलिसासह ७ जणांचा मृत्यू
6
'लॉरेन्स बिश्नोईने मला लवकर मारावे...', खासदार पप्पू यादव असं का म्हणाले?
7
IND vs NZ, 3rd Test Day 1 Stumps : फलंदाजांमुळे टीम इंडिया अडचणीत; ८६ धावांत गमावल्या ४ विकेट्स
8
"चुकीची चिठ्ठी काढणारा पोपट, आजपर्यंत...!"; शंभूराज देसाई यांचा संजय राऊतांना टोला
9
AUS vs PAK : "ऑस्ट्रेलियात पाकिस्तानने एक सामना जिंकला तर...", अक्रमने आपल्याच संघाची लाज काढली
10
मल्लिकार्जुन खरगेंनी कर्नाटक सरकारवर ताशेरे ओढले,मुख्यमंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण; नेमकं प्रकरण काय?
11
ऐन सणासुदीच्या-निवडणुकीच्या काळात मावळ हादरले! पवन मावळातील ३० वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या
12
Maharashtra Election 2024: दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे; दुभंगलेल्या शिवसेनेचे अस्तित्व पणाला
13
Washington Sundar वर का आली सहकाऱ्यांची जर्सी घालून खेळण्याची वेळ? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
"माहिमची जागा भाजपाकडे असती तर एका मिनिटात निर्णय घेतला असता, आता..." बावनकुळेंचं मोठं विधान
15
ऐकावं ते नवलंच! हेमंत सोरेन यांचे वय 5 वर्षात 7 वर्षांनी वाढले, भाजपने साधला निशणा...
16
भाजपची 'चाणक्य नीती'? १७ इच्छुकांचे तिकीट पक्के; शिंदे गट-अजित पवार गटातून संधी!
17
ज्येष्ठ शिवसैनिक प्रकाश म्हात्रे यांची शिंदे सेनेतून हकालपट्टी! पक्ष संघटनेच्या विरोधात काम करीत असल्याने कारवाई
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'आमदार निवडून आणणार,सन्मानाने पक्षात प्रवेश करणार'; उमेश पाटलांनी अजित पवारांविरोधात दंड थोपटले
19
IPL Retention 2025 : KL राहुलने स्वत:च्याच पायावर मारली कुऱ्हाड? धोनी ठरला 'व्हॅल्यू फॉर मनी'!
20
डबल मर्डर केसमध्ये एकाला पकडलं; ७० हजारांसाठी अल्पवयीन मुलाने रचला भयंकर कट

जैन साध्वी हल्ला प्रकरणात आरोपी गजाआड

By admin | Published: August 29, 2015 12:20 AM

नागपूर : इतवारीतील मोठे जैन मंदिरातील साध्वीवर हल्ला करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह दोघांना तहसील पोलिसांनी अटक केली. चोरीच्या उद्देशातून आरोपींनी हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. रुपेश पांडे (प्रेमनगर) आणि प्रकाश आमघरे (लालगंज) अशी आरोपींची नावे असून, त्यातील रुपेश हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, ...


नागपूर : इतवारीतील मोठे जैन मंदिरातील साध्वीवर हल्ला करणाऱ्या सराईत गुन्हेगारासह दोघांना तहसील पोलिसांनी अटक केली. चोरीच्या उद्देशातून आरोपींनी हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे.
रुपेश पांडे (प्रेमनगर) आणि प्रकाश आमघरे (लालगंज) अशी आरोपींची नावे असून, त्यातील रुपेश हा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असून, तो नुकताच कारागृहातून बाहेर आला. २२ ऑगस्टला दुपारी त्याला प्रकाश भेटला. हे दोघे एकत्र दारू प्यायले. याचवेळी त्यांनी रात्रीतून चोरी करण्याची योजना बनविली. त्यानुसार, रात्री ११.५० वाजता सराफा बाजारात पोहचले. तेथून मोठे जैन मंदिराच्या त्यागी भवनात पोहचले. मौल्यवान चिजवस्तू मिळण्याची त्यांना अपेक्षा होती. मात्र, कुलूप फोडताना आवाज आल्यामुळे ऐनवेळी साध्वीजींना जाग आली. त्या समोर येताच आरोपी रुपेशने त्यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केला आणि पळून गेले. या घटनेमुळे शांतीप्रिय जैन समाजात तीव्र रोष निर्माण झाला होता. साध्वींवर हल्ला करणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी चोहोबाजूने होत होती. त्यामुळे पोलिसांनी धावपळ वाढवली अखेर हे दोघे तहसील पोलिसांच्या हाती लागले.
--