नवी दिल्ली - प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. प्रेमाचे अनेक भन्नाट किस्सेही नेहमी समोर येत असतात. अशीच एक अजब प्रेमाची गजब गोष्ट आता समोर आली आहे. राजस्थानमध्ये लव्ह ट्रायंगल पाहायला मिळाला आहे. एका तरुणीसाठी दोन तरुण आपसात भिडले पण या भांडणात नंतर भलतंच सत्य त्यांच्यासमोर आलं. तरुणीबाबत असं काही समजलं की दोन्ही तरुणांना मोठा धक्काच बसला. या घटनेची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या जयपूरमध्ये ही घटना घडली आहे. दोन तरुण एकाच तरुणीसाठी भांडू लागले. आपली गर्लफ्रेंड दुसऱ्या तरुणासोबत असल्याचं अचानक समजताच दोघंही आमनेसामने आले आणि त्या तरुणीसाठी भांडण करू लागले. अखेर हे प्रकरणं पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलं. त्या दोघांनाही पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. जिच्यासाठी ते भांडत होते, ती तरुणीही पोलीस ठाण्यात आली पण काही वेळाने ती गायब झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही तरुणांना जगतपुरा परिसरातून ताब्यात घेण्यात आलं. दोघंही स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. गुरुवारी रात्री त्यांच्यामध्ये भांडण झालं. दोघंही एकाच तरुणीसाठी भांडत होते. स्थानिकांनी सांगितल्यानुसार दोन्ही तरुण 'ती फक्त माझी आहे, ती फक्त माझी आहे' म्हणत आपासत भिडले. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि दोघांनाही पकडून पोलीस ठाण्यात आणलं.
माहितीनुसार या तरुणीचं गेल्या काही वर्षांपासून दोन्ही तरुणांसोबत अफेअर सुरू होतं. अचानक त्या दोघांनाही आपली गर्लफ्रेंड एकच आहे, असं समजलं. धक्कादायक म्हणजे तरुणी दोन्ही बॉयफ्रेंडसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती आणि या तरुणांना याची माहितीच नव्हती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिली आहे.