नवी दिल्ली - स्मार्टफोन हा लहानांपासून मोठ्यापर्यंत आता प्रत्येकाच्याच जगण्याचा एक अविभाज्य भाग झाला आहे. स्मार्टफोन म्हटला की ईअरफोन्स आलेच. गाणी ऐकण्यासाठी ईअरफोनचा वापर हा हमखास केला जातो. मात्र याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ईअरफोन एका तरुणासाठी जीवघेणा ठरला आहे. गाणी ऐकताना कानातच ईअरफोनचा ब्लास्ट झाल्याची भयंकर घटना समोर आली आहे. यानंतर तरुणाच्या कानातून रक्त वाहून लागले. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या जयपूर जिल्ह्यातील उदयपुरिया गावात ही मन सुन्न करणारी घटना घडली आहे. गाणी ऐकण्यासाठी तरुणाने ईअरफोन लावले होते. त्याचदरम्यान ईअरफोनच्या स्पीकर फुटला. राकेश नागर असं या 28 वर्षीय तरुणाचं नाव आहे. ईअरफोनच्या स्फोटामुळे मोठा आवाजही झाला. राकेशच्या कानातून रक्त वाहू लागलं. त्यानंतर त्याला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
राकेश नागरचं याच वर्षी फेब्रुवारीमध्ये लग्न झालं होतं. त्याच्या अशा अचानक मृत्यूने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. तसेच ज्यावेळी ही घटना घडली तेव्हा तो एकटाच घरी होता. राकेश स्पर्धा परीक्षेची देखील तयार करत असल्याची माहिती मिळत आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, कानामध्ये ईअरफोनचा स्फोट झाल्याने मोठा आवाज आला. त्यामुळे तरुणाला कार्डियक अरेस्ट आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. ईअरफोनचा अशा प्रकारे स्फोट झाल्याने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
दोस्तीत कुस्ती! मित्राच्या फोनमध्ये होता बहिणीचा फोटो, डिलीट करण्याच्या वादातून केली निर्घृण हत्या
उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यामध्ये एक भयंकर घटना घडली आहे. मित्राच्या मोबाईलमध्ये आपल्या बहिणीचा फोटो असून तो डिलीट करत नसल्याच्या कारणावरून एकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीच्या मोबाईलमध्ये आरोपीच्या बहिणीचे काही फोटो होते. वारंवार सांगूनही मित्र ते फोटो डिलीट करत नव्हता. त्यामुळेच आरोपीने त्याची हत्या करण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.