हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. मतमोजणीच्या सुरुवातीला काँग्रेसने आघाडी घेतली होती पण काही तासातच हरयाणातील चित्र बदलले. मोठा उलटफेर करत भाजपाने पुन्हा एकदा आघाडी घेतली. दरम्यान, यावरुन काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी निवडणूक आयोगाला काही प्रश्न उपस्थित केले होते. या प्रश्नाला आता निवडणूक आयोगाना उत्तर दिले.
काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर निकालाचे अपडेट करण्यास उशीर होत असल्याचा आरोप केला आहे. निवडणूक आयोग अधिकाऱ्यांवर दबाव टाकत असल्याचा दावा त्यांनी केला.
निवडणूक आयोगाने जयराम रमेश यांच्या या आरोपांना मिनिट-टू-मिनिट डेटा अपडेटसह प्रत्युत्तर दिले. ईसीआयने म्हटले आहे की, 'लोकसभा निवडणुकीचे निकाल येणार होते त्या दिवशी ४ जून २०२४ रोजीही काँग्रेसने असेच आरोप केले होते. आयोगाला हे आरोप निराधार आणि खोटे असल्याचे आढळून आले आणि त्यांनी त्यांचे खंडन केले. निवडणूक आचार नियमांच्या नियम ६० अन्वये पूर्वनिर्धारित मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी होते, असे यापूर्वी स्पष्ट करण्यात आले आहे. आयोगाने नियुक्त केलेले अधिकारी मतमोजणीवर सतत लक्ष ठेवतात.
निवडणूक आयोग पुढे सांगितले की, 'तुम्ही ECI वेबसाइटवर हरयाणा निवडणूक निकाल डेटा अपडेट करण्यात विलंब केल्याचा आरोप केला आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, कायदेशीर तरतुदींनुसार, प्रत्येक जागेवर पडलेल्या मतांची मोजणी तेथे निवडणूक लढविणारे उमेदवार आणि पक्षांनी नियुक्त केलेल्या निरीक्षकांच्या उपस्थितीत केली जाते. डेटा अपडेट करण्यात उशीर झाल्याच्या तुमच्या निराधार आरोपांबाबत आम्हाला कोणताही पुरावा सापडलेला नाही.
जयराम रमेश यांचे आरोप निवडणूक आयोगाने फेटाळून लावला.'हरयाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल प्रत्येक ५ मिनिटांनी ECI वेबसाइटवर अपडेट केले जातात. मतमोजणीच्या सुमारे २५ फेऱ्या झाल्या आणि मतमोजणीची प्रत्येक फेरी पूर्ण झाल्यानंतर पाच मिनिटांत डेटा ECI वेबसाइटवर दिसून आला. निवडणूक आयोगाने जयराम रमेश यांचे आरोप बेजबाबदार, तथ्यहीन असल्याचे सांगत फेटाळून लावले.