नवी दिल्ली: देशाच्या राजधानीत असलेल्या इस्रायलच्या दुतावासाजवळ शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटाची जबाबदारी एका दहशतवादी संघटनेनं स्वीकारली आहे. जैश उल हिंद नावाच्या संघटनेनं दुतावासाजवळ हल्ला घडवून आणल्याचा दावा केला आहे. टेलिग्राम मेसेजच्या माध्यमातून जैश उल हिंदनं हा दावा केल्याचं सांगितलं जात आहे. '...ये तो बस ट्रेलर है'; दिल्ली स्फोटाबाबत मोठा खुलासा, लिफाफ्यातून समोर आलं 'इराण कनेक्शन''सर्वशक्तिमान अल्लाच्या कृपेनं आणि मदतीमुळे जैश उल हिंदचे सैनिक चोख बंदोबस्त असलेल्या दिल्लीतील परिसरात शिरले. त्यांनी आयईडी स्फोट घडवला. भारतातील प्रमुख शहरांना हल्ला घडवण्याची ही सुरुवात आहे. भारत सरकारकडून करण्यात येणाऱ्या अत्याचारांचा हा बदला आहे,' असा मेसेज टेलिग्रामवरून करण्यात आला आहे.दिल्ली स्फोट - इस्रायली दूतावासाबाहेर पोलिसांना सापडले बंद पाकीट, CCTV तूनही पुरावे हाती इस्रायली दुतावासाजवळ झालेल्या स्फोटाची तीव्रता फार नव्हती. या स्फोटासाठी आयईडीचा वापर करण्यात आला. स्फोटासाठी वापरण्यात आलेल्या घटकांची दोनवेळा तपासणी करण्यात आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये हाय ग्रेड मिलिट्री एक्स्लोसिव्ह PETN (pentaerythritol tetranitrate) आढळून आले आहेत. अशा प्रकारची स्फोटकं अल-कायदासारख्या प्रशिक्षित संघटनांकडे असतात, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.Delhi Blast : दिल्ली स्फोटानंतर अमित शाह अॅक्शन मोडमध्ये, बंगाल दौरा रद्द; दिले असे निर्देशआयसिसच्या एका समूहानंदेखील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत असल्याचा दावा केला आहे. मात्र सुरक्षा संस्थांना यावर विश्वास नाही. इस्रायली दुतावासाजवळ झालेल्या स्फोटानंतर काल इराणहून आलेल्या एका विमानातील सर्व प्रवाशांची चौकशी करण्यात आली. विमानाची तपासणी केली गेली. मात्र काहीही संशयास्पद आढळून आलं नाही.स्फोटामुळे काही गाड्यांचं नुकसानइस्रायलचा दूतावास दिल्लीतील अतिसुरक्षित भागात येतो. या भागात काल झालेल्या स्फोटामुळे काही गाड्यांचं नुकसान झालं. त्यांच्या काचा फुटल्या. खळबळ माजवण्यासाठी हा स्फोट घडवून आणल्याची शक्यता सुरुवातीला व्यक्त केली गेली. त्यानंतर पोलीस आयुक्त एस. एन. श्रीवास्तव यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दिल्ली पोलिसांचं विशेष पथक स्फोटाचा तपास करत असल्याचं आयुक्तांनी सांगितलं.