जयशंकरजी, पंतप्रधान मोदींना मुत्सद्देगिरीची थोडी माहिती द्या, राहुल गांधींचा टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 04:25 AM2019-10-02T04:25:53+5:302019-10-02T04:26:16+5:30

हाउडी मोदी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘अब की बार ट्रम्प सरकार’च्या टिपणीवरून लगावला टोला

Jaishankar ji, give PM Modi some information about diplomacy - Rahul Gandhi | जयशंकरजी, पंतप्रधान मोदींना मुत्सद्देगिरीची थोडी माहिती द्या, राहुल गांधींचा टीका

जयशंकरजी, पंतप्रधान मोदींना मुत्सद्देगिरीची थोडी माहिती द्या, राहुल गांधींचा टीका

Next

 नवी दिल्ली : हाउडी मोदी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘अब की बार ट्रम्प सरकार’च्या टिपणीबाबत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी केलेल्या विधानानंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, जयशंकर यांनी पंतप्रधानांना मुत्सद्देगिरीबाबत थोडी माहिती द्यावी.

राहुल गांधी यांनी टष्ट्वीट केले आहे की, जयशंकरजी आमच्या पंतप्रधानांच्या अक्षमतेवर पडदा टाकण्यासाठी धन्यवाद. ट्रम्प यांचे समर्थन केल्याने डेमोक्रॅटसोबत भारताला समस्या निर्माण झाली आहे. मी अशी आशा करतो की, आपल्या दखल देण्याने हा मुद्दा समाप्त
झाला आहे. आपण पंतप्रधान मोदी यांना मुत्सद्देगिरीबाबत थोडे शिकवावे.

जयशंकर यांनी म्हटले आहे की, ट्रम्प यांनी प्रचाराच्या काळात भारतीय-अमेरिकी समुदायाचे समर्थन प्राप्त करण्यासाठी असे म्हटले होते आणि मोदी तर त्याची पुनरावृत्ती करीत होते.

राहुल गांधी यांची केरळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याशी संवाद साधत केरळातील पूर परिस्थिती व मदतकार्य याबाबत चर्चा केली. केरळ भवन येथे चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना विजयन म्हणाले की, राज्यातील पूरस्थिती आणि मदतकार्य यावर चर्चा झाली. राज्यातील अन्य मुद्यांवरही चर्चा झाली. राहुल गांधी यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी पूर स्थितीबाबत असा विश्वास व्यक्त केला की, राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करीत आहे आणि कें द्राशीही चर्चा सुरू आहे.

Web Title: Jaishankar ji, give PM Modi some information about diplomacy - Rahul Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.