भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शनिवारी केरळमधील तिरुअनंतपुरम येथे आयोजित एका कार्यक्रमात सांगितलं की, आज मोदींची गॅरेंटी ही अशी गोष्ट आहे ज्यावर केवळ देशाचाच नाही तर जगाचाही विश्वास आहे. गेल्या 10 वर्षांत देशात अनेक बदल झाले असून आता ते परदेश दौऱ्यावर असताना तेथील लोकांना देशातील बदलांबद्दल बोलायचं आहे, असा दावा परराष्ट्रमंत्र्यांनी केला.
तिरुअनंतपुरममध्ये केंद्र सरकारच्या 'विकसित भारत संकल्प यात्रे'दरम्यान जाहीर सभेला संबोधित करताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी असं म्हटलं आहे. "आज मोदींची गॅरेंटी अशी आहे की ज्यावर केवळ देशाचाच नाही तर जगाचाही विश्वास आहे. मोदींची गॅरेंटी म्हणजे सुशासन, लोककेंद्रित धोरणे. याचा अर्थ असा की परदेशात कोणी संकटात सापडले असेल, मग ते सौदी अरेबिया, UAE मधील विद्यार्थी असोत किंवा युक्रेनमध्ये अडकलेले विद्यार्थी असोत, त्यांच्यासाठीही पंतप्रधान मोदी आहेत. गेल्या 10 वर्षात हा मोठा बदल झाला आहे."
"जेव्हा मी परदेशात जातो तेव्हा मी फक्त 10 मिनिटं आंतरराष्ट्रीय संबंधांवर चर्चा करतो आणि उर्वरित वेळ लोक माझ्याशी फक्त भारताबद्दलच चर्चा करत असतात. भारतात काय बदललं? हा बदल कसा शक्य झाला? कारण जेव्हा तुम्ही आकडे बघता तेव्हा फूड प्लॅन म्हणजे ही एक अशी योजना आहे जी संपूर्ण अमेरिका आणि संपूर्ण युरोपला मिळून एकसाथ अन्न पुरवेल. त्यामुळेच आज भारताबद्दलचा आदर खूप वाढला आहे. आदर आहे कारण ते बदल पाहत आहेत" असं एस जयशंकर यांनी म्हटलं आहे.