शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
2
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
4
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
5
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
6
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
7
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?
8
बुध वक्री अस्तंगत: ४ राशींना अडचणी, समस्या; ४ राशींना सर्वोत्तम संधी, सुखाचा वरदान काळ!
9
शेअर बाजार सुस्साट.., Sensex मध्ये २००० अंकांची तेजी; Nifty ५९० अंकांनी वधारला, अदानींचा जोरदार कमबॅक
10
स्पष्ट बहुमत मिळालं नाही तरी भाजपा सरकार स्थापन करणार? असा आहे महायुतीचा 'प्लॅन बी'  
11
बॅक टू बॅक सिनेमांमध्ये का दिसत नाही श्रद्धा कपूर? म्हणाली, "ऐनवेळी रिप्लेस केलं..."
12
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता किती? ४८ तासांत आमदारांसमोर हे आव्हान
13
हालचालींना वेग! बच्चू कडूंना महायुतीसह मविआकडूनही फोन; कोणाला पाठिंबा देणार?
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?
15
"४-५ सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित केले तर...", मराठी इंडस्ट्रीबद्दल शरद केळकरचं मोठं वक्तव्य, म्हणाला- "साऊथमध्ये..."
16
'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश; SBI, पॉवर ग्रिड, रिलायन्सवर फोकस; काय आहे टार्गेट प्राईज, आणखी कोणते शेअर्स?
17
पुन्हा तीच परिस्थिती ओढवू नये; मविआ सतर्क, विजयी आमदारांना तात्काळ मुंबईला येण्याचे निर्देश
18
IND vs AUS : स्मिथच्या पदरी 'गोल्डन डक'; Jasprit Bumrah ची हॅटट्रिक हुकली, पण...
19
"संजय राऊत हायकमांड, त्यांच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नाही", नाना पटोले यांनी लगावला टोला
20
विवाहांच्या मुहुर्तांदरम्यान सोन्या-चांदीच्या दरात बदल, पटापट चेक करा मुंबई ते दिल्लीपर्यंतचे दर

जेटलींनी केजरीवालांना माफ केलं, मागे घेणार मानहानीचा खटला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2018 4:18 PM

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणात अखेर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींची माफी मागितली आहे.

नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणात अखेर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींची माफी मागितली आहे. त्यामुळे आता अरुण जेटलीही मानहानीचा खटला मागे घेणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आम आदमी पार्टी(आप)चे नेते संजय सिंह आणि आशुतोष या तिघांनी एक पत्र जेटलींना पाठवून त्यांची माफी मागितली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अरुण जेटलींनी केजरीवालांच्या माफीचा स्वीकार केला आहे. ते लवकरच खटला मागे घेणार आहेत. 

गेल्या काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांनी नितीन गडकरी व कपिल सिब्बल यांना पत्र पाठवून त्यांचीसुद्धा माफी मागितली होती.  दोन्ही नेत्यांनी सहमतीने केस बंद करण्यासाठी कोर्टात अर्ज केला होता. अरविंद केजरीवाल यांच्या माफीनाम्यानंतर नितीन गडकरींनी पटियाला हाऊस कोर्टातील मानहानीचा खटला मागे घेतला होता.माझ्याकडून काहीही पुराव्यांशिवाय तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले. त्यामुळे तुमची बदनामी झाली हे मी जाणतो. त्याचमुळे तुम्ही माझ्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकला. मी केलेल्या आरोपांबाबत मला खेद वाटतो आहे. मी त्यासाठी तुमची माफी मागतो. माझी विनंती आहे की माझ्या विरोधातला अब्रू नुकसानीचा खटला आपण मागे घ्यावा, अशी विनंती केजरीवाल यांनी दोन्ही नेत्यांना पत्राद्वारे केली आहे.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालArun Jaitleyअरूण जेटली