ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. २० - अर्थमंत्री अरुण जेटली सोमवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आपच्या काही नेत्यांविरुद्ध अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहेत. दिल्लीत पत्रपरिषद घेऊन डीडीसीएमधील भ्रष्टाचाराबद्दल जेटलींना लक्ष्य बनविणारे आपचे नेते कुमार विश्वास, आशुतोष, संजयसिंग, राघव चड्डा, दीपक वाजपेयी यांनाही ते न्यायालयात खेचणार आहेत.
आम्हाला अरुण जेटली यांच्या प्रामाणिकपणाचा, निष्ठेचा आणि विश्वासहर्तेचा अभिमान असल्याचं मत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केलं. > पत्रकार परिषदेतील किर्ती आझाद यांचे आरोप आमची लढाई व्यक्तिगत नसून, भ्रष्टाचाराविरुध्द आहे.मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांनी सुरु केलेल्या भ्रष्टाचार विरोधी मोहिमेचा फॅन आहे. डीडीसीएशी संदर्भात १४ बनावट कंपन्या समोर आल्या आहेत, कंपन्यांना कोटयावधी रुपये देण्यात आले पण त्यांचे काम सांगितलेले नाही. डीडीसीएने बनावट पत्ते असलेल्या कंपन्यांना कंत्राटे दिली, लोक तेच पण कंपनीचे नाव बदलले जायचे.डीडीसीए घोटाळयामध्ये कंपन्यांना चौकशी केल्याशिवाय पैसे देण्यात आले, डीडीसीएचे सदस्य निविदांच्या किंमतीमध्ये फेरफार करायचे. > DDCA मधील भ्रष्ट्राचार प्रकरणी आपचे अरुण जेटली वरील आरोप - - अरुण जेटलीच्या कार्यकाळात डीडीसीएच्या स्टेडियमच्या बांधणीसाठी २४ कोटी रुपये मंजूर झाले होते. ११४ कोटी रुपये खर्च करण्यात आले. उरलेले ९० कोटी कुठे गेले ? - डीडीसीएतून पैसा काढण्यासाठी बनावट कंपन्या स्थापन करण्यात आल्या. डीडीसीएने १ कोटी ५५ लाखाचे कर्ज तीन कंपन्यांना दिले, कर्ज देण्यामागचे कारण स्पष्ट केलेले नाही - ज्या कंपन्यांनी काम केले नाही त्यांनाही डीडीसीएतून पैसा देण्यात आला - डीडीसीएचे खजिनदार नरेंद्र बत्रा यांच्याबरोबर अरुण जेटलींचे काय संबंध आहेत ?> या आरेपावर अरुण जेटली यांची प्रतिक्रिया -DDCA च्या अध्यक्ष पदावर असताना ४०००० लोक बसण्याची क्षमता असलेल स्टेडियम ११४ करोड रुपयात पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग या कंपनीच्या माध्यमातून तयार केल आहे. यामध्ये कोणताही भ्रष्टाचार अथवा गैरप्रकार झालेला नाही.