नवी दिल्ली: भारताचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे जेष्ठ नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. जेटलींच्या या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त करत त्यांचा अनेक आठवणींना उजाळा देण्यात येत आहे. जेटलींचे घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील खूप मदत केली. जेटलींनी स्वता:ची मुलं ज्या शाळेत शिकवली त्याच शाळेत घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेण्यास मदत केली.
जेटलींचे राजकीय सचिव ओम शर्मा यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते की, अरुण जेटलींच्या घरी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील त्यांनी घरातील परिवारासारखे सांभाळले. तसेच ते नेत्यांना किंवा घरातील सद्यसांना जितका मान द्यायचे तितकाच मान घरातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील देत असत. त्याचप्रमाणे त्यांनी सर्व कर्मचार्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली होती. जेटलींची मुलं चाणक्यपुरीतील कार्मेल कॉन्व्हेंट या शाळेत शिक्षण घेत होती, त्याच शाळेत त्यांनी घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना देखील शिकण्यास मदत केली. तसेच कर्मचाऱ्यांच्या मुलांना परदेशात शिक्षण घेण्याची ईच्छा असलेल्या मुलांना त्यांनी परदेशात शिक्षण घेण्यास मदत केली होती.
त्याचप्रमाणे जेटलींच्या कुटुंबासाठी जेवणाची व्यवस्था करणार्या जोगेंद्रच्या दोन मुलींपैकी एक मुलगी लंडनमध्ये शिकत असल्याचे बोलले जाते. तसेच कर्मचाऱ्यांची मुलं एमबीए किंवा कोणताही व्यावसायिक अभ्यासक्रम शिकवू इच्छितात त्यांच्यासाठी अरुण जेटली फी पासून नोकरीची व्यवस्था करत असत.
नोटाबंदी आणि जीएसटी यासारखे धाडसी निर्णय राबवणारे देशाचे माजी अर्थमंत्री आणि भाजपाचे पहिल्या फळीतील नेते अरुण जेटली यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्यानं ९ ऑगस्ट रोजी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर आवश्यक ते सर्व उपचार केले गेले, पण त्यांची प्रकृती खालावतच गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला.