शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

जेटली यांचा मनमोहनसिंगांवर पलटवार

By admin | Published: February 14, 2016 3:40 AM

मोदी सरकारवर टीका करणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी पलटवार केला. संपुआ ते रालोआ सरकारचा प्रवास म्हणजे

नवी दिल्ली : मोदी सरकारवर टीका करणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी शनिवारी पलटवार केला. संपुआ ते रालोआ सरकारचा प्रवास म्हणजे धोरणात्मक पंगुतेपासून जागतिक स्तरावर अत्युच्च शिखर गाठण्याचा आहे, असे प्रतिपादन करतानाच वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) सारख्या महत्त्वाच्या विधेयकांवर काँग्रेसची भूमिका राजकारणाने प्रेरित आणि दुटप्पी असल्याचा आरोप जेटली यांनी केला.जेटली यांनी ‘डॉ. मनमोहनसिंग यांनी आपल्या पक्षाला काय सल्ला दिला पाहिजे’ या मथळ्याखाली फेसबुक पोस्ट टाकली आहे. त्यात ते म्हणतात, संपुआ सरकारच्या कार्यकाळात काँग्रेस मुख्यालय, २४ अकबर रोडवर धोरण निर्मिती होत असे. याउलट रालोआ सरकारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय अंतिम असतो. माजी राष्ट्रपती आणि पंतप्रधान फार क्वचित बोलतात. परंतु जेव्हा ते आपले मनोगत मांडतात तेव्हा देश गांभीर्याने त्यांचे म्हणणे ऐकत असतो. ते देशाच्या समजूतदारपणाचे, विवेकाचे प्रतिनिधित्व करीत असतात याकडे लक्ष वेधताना माजी पंतप्रधानांनी निष्पक्ष राहून विधायक सल्ला दिला पाहिजे, असे मत जेटली यांनी मांडले. सोबतच कधीकधी त्यांनी आपल्या राजकीय पक्षालासुद्धा राष्ट्रहितासाठी ठोस काम करण्याचा संदेश दिला पाहिजे, अशी कोपरखळी मारली. आपण डॉ. सिंग यांचा आदर करीत असून त्यांच्याकडूनही आपल्याला अशाच आदराची अपेक्षा असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. सिंग यांनी एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीचा हवाला देऊन जेटली म्हणाले की, मनमोहनसिंग यांनी निष्पक्षपणे विद्यमान सरकारची मीमांसा केल्यास भारतात असे सरकार आहे ज्यात अंतिम निर्णय पंतप्रधानांचा असतो आणि नैसर्गिक स्रोतांचे वाटप कुठल्याही भ्रष्टाचाराशिवाय पारदर्शक प्रक्रियेद्वारे केले जाते याची जाणीव त्यांना निश्चित होईल. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जनतेचा विश्वास राहिलेला नाही. या सरकारची धोरणेही अस्पष्ट असल्याने अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. हे सरकार सर्वांत कमकुवत सरकार आहे, अशा शब्दांत मनमोहनसिंग यांनी मोदी सरकारवर तोफ डागली होती. त्याला जेटलींनी जोरदार प्रत्युत्तर दिले.(लोकमत न्यूज नेटवर्क)