शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

जेटलींच्या पोतडीत कर सवलतींचे मलम?

By admin | Published: December 27, 2016 4:39 AM

नोटाबंदीच्या निर्णयाने होरपळलेल्या जनतेला दिलासा देण्यास व मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आगामी अर्थसंकल्पात करसवलतींची

नवी दिल्ली : नोटाबंदीच्या निर्णयाने होरपळलेल्या जनतेला दिलासा देण्यास व मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली आगामी अर्थसंकल्पात करसवलतींची मलमपट्टी करतील, असे जाणकारांना वाटते.नंतर मिळणाऱ्या लाभांसाठी (गेन) नोटाबंदीची कळ (पेन) ५० दिवस सोसा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. कमालीची गैरसोय होऊनही जनतेने सरकारवर विश्वास ठेवून हा त्रास निमुटपणे सहन केला. मोदींनी याबद्दल लोकांना भरभरून धन्यवादही दिले. आता सरकार केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून लोकांचे कृतीतून आभार मानेल, असे संकेत आहेत.स्वत: जेटली यांनी सोमवारी दिल्लीत एका कार्यक्रमात जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारतातील कर आकारणीची पातळी एकूणच कमी करण्याची गरज सूचित केली. तसेच लोकांना कर चुकविण्याऐवजी तो भरावासा वाटावा, अशी करप्रणाली असण्यावरही भर दिला. त्यांचा रोख कंपन्यांवर आकारल्या जाणाऱ्या कॉर्पोरेट टॅक्सच्या दिशेने होता तरी अर्थसंकल्पात प्रत्यक्ष करांमध्ये फेरबदल करण्यावर आणि करांचे दर कमी करून जास्तीतजास्त लोकांना करांच्या चौकटीत आणण्यावर भर दिला जाईल, असे दिसते. जाणकारांच्या मते येत्या १ एप्रिलपासून जीएसटी लागू करण्याचा सरकारचा निर्धार असल्याने तो लागू झाल्यावर अप्रत्यक्ष करांच्या बाबतीत फेरबदल करण्यास अर्थसंकल्पात फारसा वाव नाही. त्यामुळे प्राप्तिकरासह अन्य प्रत्यक्ष करांवरच भर दिला जाईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)नोकरदारांना खूश करणार?माहीतगारांच्या मते प्राप्तिकराच्या दरांमध्ये मोठी कपात केली नाही तरी कर आकारणीच्या ‘स्लॅब’ची पुनर्रचना करूनही समाजातील मोठ्या वर्गाला आणि खासकरून नोकरदार, मध्यमवर्गाला मोठा दिलासा दिला जाऊ शकतो. असे करण्याची आर्थिक आणि राजकीय कारणेही आहेत. अर्थव्यवस्थेला उभारी देणार?काहीशी बाळसे धरू लागलेली अर्थव्यवस्था नोटाबंदीच्या उलथापालथीने गेला दीड महिना थबकल्यागत झाली आहे. व्यापार-उदीम व रोजगार मंदावला आहे. याला पुन्हा उभारी देण्यासाठी वित्तमंत्री जेटली यांना कर सवलतींची व कर फेररचनेची कास धरावी लागेल, असा विचार सरकारी पातळीवर पक्का होत आहे. मतांसाठी बेगमी करणारशिवाय उत्तर प्रदेश  आणि पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही  तोंडावर असल्याने, नोटाबंदीमुळे व्यक्त न झालेली; परंतु धुमसणारी नाराजी मतपेटीतून व्यक्त होऊ नये यासाठीही जेटलींना आपल्या पोतडीचे बंद जरा सैल सोडावे लागणार आहेत.पंतप्रधानांनी बोलावली अर्थतज्ञ्जांची बैठकसरकारने घेतलेल्या निर्णयानुसार यंदाचा अर्थसंकल्प महिनाभर लवकर म्हणजे १ फेब्रुवारीस मांडला जाणे अपेक्षित आहे. त्यासाठी सरकारच्या विविध खात्यांमध्ये व सरकारबाहेरील संबंधित व्यक्ती व संस्थांशी सल्लामसलत रीतसर सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान मोदी उद्या मंगळवारी निती आयोगाचे सदस्य व देशातील प्रमुख अर्थतज्ज्ञांची बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. त्यानंतर अर्थसंकल्प आणि त्यातील कर याविषयी सर्वोच्च पातळीवर येत्या दोन आठवड्यांत निर्णय होणे अपेक्षित आहे.जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भारतातील कर आकारणीची पातळी एकूणच कमी करण्याची गरज आहे. तसेच लोकांना कर चुकविण्याऐवजी तो भरावासा वाटावा, अशी करप्रणाली असण्याची गरज आहे. - अरुण जेटली, अर्थमंत्री