मनाेज रमेश जाेशी
हैदराबाद : शेक्सपिअरने म्हटले आहे की, नावात काय आहे? मात्र, निवडणुकीच्या रिंगणात आता नावांवरुनच डावपेच आखले जात आहेत. तेलंगणामध्ये राष्ट्रीय आणि स्थानिक राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या नावांवरुन रणनिती आखल्याचे आढळत आहे. छाेट्या पक्षांनी दिग्गज नेत्यांच्या नावाशी साधर्म्य असलेले उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण हाेईल आणि मतांच्या विभागणीचा फायदा हाेईल.
nनिर्मल येथून सत्ताधारी बीआरएसचे नेते व राज्यमंत्री अल्लाेला इंद्रकरण रेड्डी हे रिंगणात आहेत. nत्यांच्याविराेधात लाेकशाही परिवर्तन पक्षाच्या आघाडीचे मंथेना इंद्रकरण रेड्डी हे लढत आहेत. nकाॅंग्रेसने पी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राज्यात नाेंदणीकृत राष्ट्रीय व स्थानिक पक्षांच्या उमेदवारांसह २,२९० उमेदवार रिंगणात आहेत. त्यात अपक्ष उमेदवारही आहेत. एखाद्या उमेदवाराविराेधात त्याच्याच नावाशी साधर्म्य असलेला अपक्ष किंवा छाेट्या पक्षाचा उमेदवार उभा केला आहे. ही रणनिती किती यशस्वी ठरते, याकडे अनेकांचे लक्ष आहे.
मुख्यमंत्रीही सुटले नाहीत
मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हे कामारेड्डी येथूनही निवडणूक लढवित आहेत. त्यांच्याविराेधात चंद्रशेखर नावाचे आणखी एक उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.
करीमनगर येथे बीआरएसचे मंत्री जी. कमलाकर हे निवडणूक लढवित आहेत. त्यांच्याविराेधात अपक्ष उमेदवार जी. कमलाकर हेदेखील निवडणूक लढवित आहेत. पी. श्रीनिवास, एन. श्रीनिवास, बी. श्रीनिवास, पी. श्रीनिवास हेदेखील करीमनगर येथूनच रिंगणात आहेत.
बसपचे प्रदेशाध्यक्ष आर. एस. प्रविणकुमार हे सिरपूर येथून लढत आहेत. त्याच ठिकाणी अखिल भारतीय फाॅरवर्ड ब्लाॅकचे डाेंगरी प्रविणकुमार हेदेखील रिंगणात आहेत.
समान नावे असलेले आणखी उमेदवारमेडक : एम. राेहीत, व्ही. राेहित, सी. क्रांती किरण, एन. क्रांती कुमार, पी. क्रांती कुमार. नरसापूर : एस. लक्ष्मारेड्डी, सी. लक्ष्मारेड्डी, पी. लक्ष्मी, बी. लक्ष्मी.झहीराबाद : ए. चंद्रशेखर, बी. चंद्रकांत.मलकाजगिरी : एम. राजशेखर रेड्डी, व्ही. राजशेखर रेड्डी