शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
3
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
4
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
5
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
6
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
7
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
8
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
9
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
10
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
11
'पंचायत'च्या मेकर्सने केली नव्या सिनेमाची घोषणा, सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत! 'या' दिवशी होणार प्रदर्शित
12
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
13
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
14
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
15
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
16
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
17
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
18
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
19
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"

जलेबी बाबाचा तुरूंगात मृत्यू! मादक पदार्थ देऊन महिलांवर करायचा बलात्कार, अनेकांना फसवले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2024 3:53 PM

अमरपुरी उर्फ जलेबी बाबा याची मंगळवारी रात्री अचानक तब्येत बिघडली.

Jalebi Baba Death हरयाणातील बालकनाथ मंदिराचा तत्कालीन पुजारी अमरपुरी उर्फ जलेबी बाबा याची मंगळवारी रात्री अचानक तब्येत बिघडली. कैद असलेल्या जलेबी बाबाला पोलिसांनी जवळच्या इस्पितळात नेले. तिथून त्याला जवळील अग्रोहा मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले. तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. जलेबी बाबा महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी १४ वर्षांची शिक्षा भोगत होता. हरयाणाच्या फतेहाबाद जिल्ह्याच्या टोहाना येथील रहिवासी असलेल्या जलेबी बाबाने महिलांचा लैंगिक छळ केला होता. याच्या अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. 

तेव्हा टोहानाच्या नागरिकांनी या बाबाविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले होते. हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर स्थानिक पोलिसांनी १९ जुलै २०१८ जलेबी बाबावर बलात्कार आणि आयटी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. मग पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याच्या माहितीवरून त्याच्या घरातून १०० हून अधिक व्हिडीओ जप्त केल्या. यामध्ये तो वेगवेगळ्या महिलांसोबत संबंध ठेवताना दिसत होता. बलात्काराचा व्हिडीओ बनवल्याप्रकरणी फतेहाबाद न्यायालयाने त्याला १४ वर्षांचा तुरुंगवास आणि ३५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती.

जलेबी बाबाचा मृत्यू खरे तर शिक्षा भोगत असतानाच जलेबी बाबाचा मृत्यू झाला. दरम्यान, चहामध्ये अंमली पदार्थ मिसळून जवळपास १२० महिलांना ती प्यायला देऊन त्यांच्यावर अत्याचार केला असल्याचा आरोप जलेबी बाबावर करण्यात आला होता. त्यानंतर २०२३ मध्ये फतेहाबाद फास्ट ट्रॅक कोर्टाचे न्यायाधीश बलवंत सिंह यांनी ५ जानेवारी २०२३ रोजी जलेबी बाबाला दोषी घोषित केले. कोर्टाने जलेबी बाबाला ३५ हजार रूपयांचा दंड देखील ठोठावला होता. २०१८ मध्ये टोहाना पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या तक्रारीनंतर, जलेबी बाबावर पॉक्सो कायद्याच्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

बिल्लू उर्फ जलेबी बाबा फारच तरबेज होता. तो महिलांना सांगत होता की, त्यांच्यावर भूतांची सावली आहे. घाबरून महिला त्याच्या बोलण्यात येत होत्या आणि भूतांपासून पिच्छा सोडवण्यासाठी जलेबी बाबाच्या तांत्रिक क्रियामध्ये सहभागी होत होता. कथितपणे बाबा तंत्र विद्या करताना महिलांना मादक पदार्थ देत होता. ज्यामुळे महिला बेशुद्ध होत होत्या. त्यानंतर बिल्लू त्यांच्यावर अत्याचार करून व्हिडीओ बनवत होता. महिलांना ब्लॅकमेल करून तो मोठी रक्कम वसूलत होता. इतकेच नाही तर महिलांना धमकी देऊन तो त्यांच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंधही ठेवत होता. 

टॅग्स :HaryanaहरयाणाDeathमृत्यूsexual harassmentलैंगिक छळ