शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

गिरणाच्या लाभक्षेत्रातील धरणांमुळे जळगावला टंचाई पाणी आरक्षण जाहीर : मालेगावची वाढीव मागणी फेटाळली

By admin | Published: November 04, 2015 11:29 PM

(ग्रामीणसाठी/हॅलोवर घेतली आहे)

(ग्रामीणसाठी/हॅलोवर घेतली आहे)
जळगाव : गिरणा धरणाच्या लाभक्षेत्रावर चणकापूर, हरणबारी या धरणांची निर्मिती झाल्यामुळे हे गिरणा धरण पूर्ण भरत नाही. त्यावेळी जळगाव जिल्ह्यातून विरोध न झाल्याने चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, अमळनेर, पारोळा, धरणगाव व एरंडोल या तालुक्यातील २५० गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत असतो. मालेगाव शहरासाठी चणकापूर धरणावरून व्यवस्था करावी असे सांगत त्यांची वाढीव पाण्याची मागणी पाणी आरक्षण बैठकीत बुधवारी फेटाळण्यात आली.
जिल्हा नियोजन विभागाच्या सभागृहात पाणी आरक्षणाची बैठक झाली. या बैठकीला पालकमंत्री एकनाथराव खडसे, जि.प.अध्यक्षा प्रयाग कोळी, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल उपस्थित होते.
पालकमंत्री खडसे यांनी जिल्ह्यातील जलसाठ्यांमधील सद्यस्थितीचा आढावा घेतला. गिरणा जलाशय ते जामदा बंधारा येथून गिरणा नदीकाठावरील १०८ गावे, एरंडोल, भडगाव, चाळीसगाव, खरजईसह चाळीसगाव तालुक्यातील १४ गावांसाठी पाण्याचे आरक्षण करण्यात आले.
त्यानंतर जामदा बंधारा ते दहिगाव बंधारा या दरम्यान पाचोरा, हनुमंतखेडे व एरंडोल तालुक्यातील २५ गावे, भडगाव तालुक्यातील महिंदळे, पळासखेडे, टिटवी तांडा, आमडदे ग्रामीण पाणी पुरवठा योजना, कजगासह चार गावे तसेच पाचोरा तालुक्यातील माहिजीसह तीन गावे, एरंडोल तालुक्यातील आडगावसह १५ गावांसाठी पाणी आरक्षित करण्यात आले. यासोबतच पिंपळगाव म्हाळसा, पिलखोड, गिरड, शिंंदी पाणी पुरवठा योजना, पिंपळगाव बुद्रुक पाणी योजना, लोण प्र.अ., कळमडूसह चार गावे व भडगाव शहरासाठी पाणी आरक्षण करण्यात आले. मन्याड धरणातून २१.५० दलघफू पाणी आरक्षित करण्यात आले. बोरी धरणात १७५ दलघफू पाणी आरक्षित करण्यात आले आहे. या धरणात मृत साठा असल्यामुळे मात्र पाणी देता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. भोकरबारी धरणातील १० दलघफू पाणी आरक्षित करण्यात आले आहे. अंजनी मध्यम प्रकल्प १०५ दलघफू पाणी आरक्षित करण्यात आले आहे. यात एरंडोल, धरणगाव व कासोदा या शहरांना पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
भुसावळ तालुक्यातील हतनुर धरणातून औद्योगिक बिगर सिंचनसाठी १८६४.१४ दलघफू तर नगरपालिकांसाठी बिगर सिंचनासाठी १४२१.३५ दलघफू पाणी आरक्षीत करण्यात आले आहे. या धरणातून ग्रामीण पाणी पुरवठा योजनेसाठी ३७१५.५७ दलघफू पाणी प्रस्तावित करण्यात आले.