शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

जळगावकर होणार विश्वविक्रमाचे दावेदार! जलबचतीचा संदेश : ७ एकरात साकारली महाकाय रांगोळी

By admin | Published: April 10, 2016 10:37 PM

जळगाव : जलबचतीचा संदेश देण्यासाठी जळगावकरांनी रविवारी राष्ट्रीय महामार्गावरील खेडी शिवारातील दूरदर्शन टॉवरजवळ ७ एकर क्षेत्रात मनोवेधक महाकाय रांगोळी साकारली. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यासाठी या उपक्रमाचे नामांकन दाखल करण्यात येणार असून लवकरच जळगावकर विश्वविक्रमाचे दावेदार होणार आहेत.

जळगाव : जलबचतीचा संदेश देण्यासाठी जळगावकरांनी रविवारी राष्ट्रीय महामार्गावरील खेडी शिवारातील दूरदर्शन टॉवरजवळ ७ एकर क्षेत्रात मनोवेधक महाकाय रांगोळी साकारली. गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यासाठी या उपक्रमाचे नामांकन दाखल करण्यात येणार असून लवकरच जळगावकर विश्वविक्रमाचे दावेदार होणार आहेत.

सर्वात जलद साकारलेली व मोठी रांगोळी
जमिनीवरून डोळ्यांमध्ये न सामवणारी तब्बल ७ एकर क्षेत्रातील महाकाय रांगोळी साकारून जळगावकरांनी संपूर्ण विश्वाला जलबचतीचा संदेश दिला आहे. जगातील आतापर्यंतची सर्वात जलद साकारलेली व मोठी रांगोळी असल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. यापूर्वीचा विश्वविक्रम हा साडेसहा एकर आकाराच्या रांगोळीचा होता. तिला साकारण्यासाठी दोन तासांचा कालावधी लागला होता. मात्र, शासनाचा जलसंपदा विभाग, नीर फाउंडेशन व जैन इरिगेशन सिस्टीम्स् यांच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात आलेल्या महाकाय रांगोळीसाठी केवळ ४० मिनिटांचा कालावधी लागल्याने हा नवा विश्वविक्रम झाला आहे. त्यामुळे या उपक्रमाचे नामांकन गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी पाठवण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

पर्यावरणपूरक रंगांचा वापर
रांगोळी साकारण्यासाठी ६५ टन रांगोळी लागली. त्यात भरण्यात आलेले निरनिराळे रंग हे पर्यावरणपूरक आहेत. ही विलोभनीय व मनोवेधक रांगोळी नागरिकांसाठी मंगळवारपर्यंत उपलब्ध राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.