ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. २३ - जलिकट्टू या पारंपरिक खेळावरील बंदी हटवण्यात यावी या मागणीसाठी गेल्या आठवड्याभरापासून मरीना बीचवर आंदोलन करणा-यांवर पोलिसांनी सोमवारी सकाळी कारवाईचा बडगा उगारला. ' तुमची मागणी आता मान्य झाली आहे, त्यामुळे आता हा परिसर रिकामा करा' असे आदेश पोलिसांनी आंदोलकांना दिवे. मात्र आंदोलकांनी जागेवरून हटण्यास नकार देत पोलिसांनी कारवाई केल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिल्याने बीचवरील परिस्थिती चिघळली आहे. पोलिसांनी लाठीमार करत आंदोलकांना हटवण्यास सुरुवात केली आहे.
जलिकट्टूवर घातलेली बंदी तात्पुरत्या स्वरुपात उठवल्यानंतरही तामिळी जनतेचा असंतोष शांत झालेला नाही. अध्यादेश काढूनही जलिकट्टूचा तिढा कायम आहे. या खेळावरील बंदीसदंर्भात कायमस्वरूपी तोडगा काढावा तसेच 'पेटा' या प्राणीप्रेमी संघटनेवर बंदी घालावी या मागणीसाठी मरिना बीचवर गेल्या आठवड्याभरापासून आंदोलन सुरू आहे. मरिना बीचवरील हजारो आंदोलकांनी बीच परिसर खाली करावी अशी विनंती पोलिसांनी केली. मात्र रण्याची आंदोलकांनी ही विनंती धूडकावून लावत कारवाई केल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिला. त्यानंतर बीच परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला आणि त्यांनी आंदोलकांना हटवण्यास सुरुवात केली.
#Jallikattu supporters being forcefully evicted by police from the protesting site in Madurai's Tamukkam #TamilNadupic.twitter.com/1n1mEqo0TH— ANI (@ANI_news) 23 January 2017
Tamil Nadu: Police forcefully evict protesters assembled at Coimbatore's VOC Ground #Jallikattu— ANI (@ANI_news) 23 January 2017
Fishermen come out in support of the protesters at Chennai's Marina Beach #Jallikattupic.twitter.com/O51vPseSq1— ANI (@ANI_news) 23 January 2017