तामिळनाडूमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या पोंगल सणाच्या निमित्ताने खेळल्या जाणाऱ्या जल्लीकट्टू या पारंपरिक खेळाला सुरुवात झाली आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्थान तैनात करण्यात आली आहे. जलीकट्टू या खेळाचा अर्थ आहे, वळूंना (देशी बैल) वश करणे. या खेळाला 2500 वर्षांची परंपरा आहे. अनेक लोक या खेळात मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. या खेळात जिंकणाऱ्याला आणि ज्या वळूवर ताबा मिळवता आला नाही, त्यांच्या मालकाला रोख रकमेचा पुरस्कार दिले जातात.
मदुरै येथील अवनीपुरममध्ये जल्लीकट्टू खेळाचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये 700 वळूंचा समावेश आहे. अवनीपुरम जल्लीकट्टू खेळाला बुधवारी सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. यामध्ये 700 वळूंवर ताबा मिळवण्यासाठी 730 लोक मैदानात उतरले आहेत. या खेळावर संपूर्ण देखरेखीसाठी मद्रास हायकोर्टाने निवृत्त न्यायाधिशांची एक समिती स्थापन केली आहे. वळू आणि त्यावर ताबा मिळवण्यासाठी भाग घेणाऱ्या स्पर्धकाला मेडिकल चेकअपनंतरच मैदानात पाठवण्यात येत आहे.
आज संध्याकाळी चार वाजेपर्यंत या खेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक तासाला जवळपास 75 स्पर्धक या खेळासाठी मैदानात उतरतात. या संपूर्ण खेळाचे सीसीटीव्ही आणि रेकॉर्डिंग केले जाणार आहे. अवनीपुरममध्ये कायदा-सुव्यवस्था बिघडू नये म्हणून 1000 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. तसेच, 30 सदस्यांची एक मेडिकल टीम असून यामध्ये डॉक्टर आणि नर्स याशिवाय 10 एम्बुलन्सचा समावेश आहे.
या खेळाची परंपरा किमान 2500 वर्षे जुनी आहे असे म्हटले जाते. प्राचीन काळी स्वयंवरासाठी देखील या खेळाचे आयोजन होत असे. मदुराई, तिरुचिरापल्ली, थेनी, पुदुक्कोटाई आणि दिंडीगुल या तामिळनाडूमधील जिल्ह्यांमध्ये हा खेळ प्रामुख्याने खेळला जात असे. कार्टाने बंदी घालण्यापूर्वी मदुराईमध्ये मोठ्या प्रमाणावर हा खेळ खेळला जात असे.
(जाणून घ्या जलीकट्टू म्हणजे काय?)
जलीकट्टू हा खेळ देशातील सर्वात धोकादायक खेळांपैकी एक मानला जातो. या खेळामुळे आतापर्यंत कित्येक लोक मृत्यूमुखी पडले आहे तर अनेकांना अपंगत्वदेखील आले आहे. या खेळात ज्या वळूंचा वापर होतो त्यांच्यावर अत्याचार केले जातात अशी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने या खेळावर बंदी घातली आहे. तरीही तामिळनाडूनमध्ये या खेळाचे आयोजन करतात.
महत्त्वाच्या बातम्या
सीएएवर मलेशियाच्या पंतप्रधानांची आगपाखड, भारत असा शिकवणार धडा
शिवसेनेने केली भाजपसोबत हातमिळवणी; महाविकास आघाडीला फासला हरताळ
सोन्याच्या दागिन्यांवर देशभर आजपासून हॉलमार्किंग लागू; १४,१८ व २२ कॅरेटचेच विकले जाणार
आयात केलेला कांदा सडून जाण्याची भीती; दर कमी झाल्याने राज्यांकडून मागणी नाही