ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 18 : तामिळनाडूमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या पोंगल सणाच्या निमित्ताने खेळल्या जाणाऱ्या जल्लीकट्टू या पारंपरिक खेळावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी आणली आहे. न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आज चेन्नईच हजारो नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. यामध्ये विद्यार्थी आणि तरुणांचे प्रमाण सर्वाधिक आहे. चेन्नईमधील प्रसिद्ध मरिना समुद्रकिनानाऱ्यावर काल (मंगळवार) रात्रीपासून हजारो आंदोलक जल्लिकट्टु व्हायलाच हवा, या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. तमिळनाडूचे मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांनी या प्रकरणी हस्तक्षेप केल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यास आंदोलकांनी नकार दिला आहे.
पेटा व इतर प्राणीवादी संघटनांनी जल्लिकट्टुस परवानगी दिली जाऊ नये, या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने यास मान्यता दर्शविल्याने मिळनाडूमधील हजारो संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले आहेत.
National media have started reporting live on the 'massive crowds at #Marina. Huge clamour 4 #jallikattu.— Sreedhar Pillai (@sri50) 18 January 2017
#WATCH: People gather in huge numbers at Chennai's Marina Beach in support of #Jallikattupic.twitter.com/hKvBVI2kEr— ANI (@ANI_news) 18 January 2017