जालोर : गुजरातला लागून असलेल्या राजस्थानमधील जलोर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना संक्रमणामुळे (Corona infection) परिस्थिती गंभीर होत आहे. असे असूनही येथील आरोग्य प्रशासन गंभीर नाही. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या रूग्णालयात व्हेंटिलेटर (Ventilator) असूनही ते चालू केले जात नाही, असे सांगत जलोरमधील भाजपाचे आमदार जोगेश्वर गर्ग (Jogeshwar Garg) यांनी ट्विट करत आता केवळ आत्महत्या (Suicide)करणे बाकी आहे, असे म्हटले आहे.
जलोरचे आमदार जोगेश्वर गर्ग यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, "माझ्या सर्व ताकदीने आणि समजुतीपणाने काम करून थकलो. परिणाम शून्य. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उभे राहून आत्मदहन करणे बाकी आहे. जर तुम्ही म्हणाला, तर हे व्हेंटिलेटर सुरू केले जातील याची हमी दिल्यास आत्महत्या सुद्धा करेन." दुसरीकडे, जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे की, सध्या कर्मचारी नसल्याने हे व्हेंटिलेटर चालू करता येत नाहीत. कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येत असून लवकरच हे व्हेंटिलेटर सुरू केले जाईल.
विशेष म्हणजे, जलोर जिल्ह्यात गेल्या 22 दिवसांत कोरोनामुळे 175 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वैद्यकीय विभाग आणि प्रशासनाच्या उदासीनतेचा परिणाम असा आहे की, अशा गंभीर परिस्थिती असूनही जिल्हा रुग्णालयात पडून असलेल्या 23 व्हेंटिलेटरपैकी एकही सुरू होऊ शकला नाही. जिल्हा रुग्णालयात काही व्हेंटिलेटर पॅकिंगमध्ये आहेत तर काही वॉर्डात बंद आहेत. त्याचबरोबर काही आयसीयू वॉर्डात ठेवले आहेत. दरम्यान, सोमवारी कोरोनाग्रस्त 16 रुग्णांचा मृत्यू झाला तर 6 रूग्णांचा बुधवारी जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. मात्र, अद्याप प्रशासनाच्या संकेतस्थळावर चुकीची आकडेवारी दर्शविली जात आहे.
(भारतातील कोरोना व्हेरिएंटचा जगात हाहाकार! 44 देशांमध्ये प्रादुर्भाव असल्याचे WHO ने सांगितले)
भारतात कोरोनाचा हाहाकार30 कोटींहून अधिक लोकसंख्या असलेला भारत कोरोना व्हायसरच्या साथीमुळे जगातील दुसऱ्या क्रमांकाचा प्रभावित देश आहे. अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. गेल्या काही आठवड्यांपासून भारतात दररोज 3 लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची प्रकरणे नोंदवली जात आहेत. त्याचबरोबर, दररोज सुमारे 4 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटेचा राजधानी दिल्ली आणि मुंबईसारख्या मोठ्या शहरांवर मोठ्या प्रादुर्भाव आहे.
गेल्या 24 तासांत 4205 जणांनी जीव गमावलाकोरोनामुळे देशातील स्थिती चिंताजनक आहे. यावर मात करण्यासाठी देशात अनेक ठिकाणी लॉकडाऊन सुरू आहे. मात्र तरीही कोरोनाग्रस्तांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. याआधी 7 मे रोजी कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आता तब्बल 4205 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. बुधवारी (12 एप्रिल) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,48,421 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 2,33,40,938 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 2,54,197 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 37,04,099 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 1,93,82,642 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.