शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालानंतर सत्तेची समीकरणं बदलणार?; ; अजित पवार गटाच्या आणखी एका नेत्याचा दावा
2
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला
3
Maharashtra: "अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत, तोपर्यंत एकत्र येणे..."; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
4
“जो शब्द दिला तो पाळतात, अजित पवार मर्द माणूस”; नवाब मलिकांनी केले तोंडभरून कौतुक
5
Vidhan Sabha 2024: उमरेडमध्ये 'पारवें'चे डबल इंजिन धावणार की, काँग्रेसचे 'दलित कार्ड' चालणार?
6
भारताविरूद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का; दुखापतग्रस्त खेळाडूने मैदान सोडले!
7
शेअर बाजारात २ दिवसांत कमावलं, ते काही तासांत गमावलं! या सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण
8
काँग्रेसचा प्रचार धडाका! राहुल गांधी, प्रियंका गांधी, खरगेंसह प्रमुख नेते महाराष्ट्रात
9
"जिवंत राहिले तर...!"; सुजलेल्या चेहऱ्यासह फोटो शेअर करत साध्वी प्रज्ञा सिंह यांचा काँग्रेसवर आरोप
10
सौरव गांगुलीचा सल्ला अन् भारताच्या स्टार खेळाडूनं 'निवृत्ती'चा निर्णय बदलला, म्हणाला...
11
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येबाबत मोठी अपडेट, आरोपींनी आधीच शस्त्रे लपवली होती, पुण्यातून आणखी दोन जणांना अटक
12
कोण आहेत भारतीय वंशाचे कश्यप 'काश' पटेल? डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू, जे बनू शकतात CIA चीफ!
13
Gold Rates Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी 'गुड न्यूज', जोरदार आपटलाय भाव! पटापट चेक करा 14 ते 24 कॅरेट सोन्याचा लेटेस्ट रेट
14
३५४ मतदार... झोपडीतील मतदान केंद्र...; २० किमी पायपीट करून निरीक्षकांनी केली पाहणी
15
आज दहशतवादी गांधी कुटुंबाची मदत मागताहेत; 'त्या' पत्रावरुन स्मृती इराणींचा हल्लाबोल
16
Shah Rukh Khan : "माझा फोन २ नोव्हेंबरला चोरीला गेला"; शाहरुखला धमकावल्याचा आरोप असलेल्या फैजानचा दावा
17
सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी विचारला घटनात्मक प्रश्न; AI Lawyer दिले ‘असे’ उत्तर, Video व्हायरल
18
"मी एक हिंदू आहे त्यामुळे..."; एकता कपूर असं काय म्हणाली की नेटकऱ्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
19
अली फजल अन् रिचा चड्डाच्या लेकीचं नाव आलं समोर, अर्थही आहे खूपच खास
20
Truecaller कंपनीवर आयकर विभागाचा छापा, कार्यालयाची घेतली झाडाझडती

सावधान... ती म्हणाली, मला जीव द्यावासा वाटतोय; अन् मोमो चॅलेंजसाठी मेसेज आला!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 11:09 AM

ब्लू व्हेल गेम आणि किकी चॅलेंजनंतर आता सोशल मीडियावर मोमो चॅलेंज हा जीवघेणा खेळ जोरदार व्हायरल होत आहे.

कोलकाता- ब्लू व्हेल गेम आणि किकी चॅलेंजनंतर आता सोशल मीडियावर मोमो चॅलेंज हा जीवघेणा खेळ जोरदार व्हायरल होत आहे. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून हा धोकादायक गेम सर्वत्र पसरत आहे. या गेमवरून आता पश्चिम बंगालमध्ये एक तक्रार दाखल झाली आहे. पश्चिम बंगालच्या जलपाईगुडीमधील एका कॉलेज विद्यार्थिनीनं मोमो चॅलेंज प्रकरणात तक्रार नोंदवली आहे. त्या विद्यार्थिनीच्या मते, एका अज्ञातानं तिला व्हॉट्सअॅपवर मेसेज करून मोमो चॅलेंज गेम खेळण्यासाठी भाग पाडण्याचा प्रयत्न केला. त्या विद्यार्थिनीनं तक्रारी म्हटलं आहे की, स्वतःच्या आईबरोबर झालेल्या भांडणानंतर त्या विद्यार्थिनीनं सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली.त्या पोस्टमध्ये तिनं आईशी भांडण झाल्यानं जीव द्यावासा वाटतोय, असं लिहिलं होतं. माझी पोस्ट सोशल मीडियावर टाकल्यानंतर थोड्याच वेळानं माझ्या मोबाइलवर एका अज्ञात व्हॉट्सअॅप नंबरवरून मेसेज आला, ज्यात मला मोमो चॅलेंज गेम खेळण्याचं आवाहन दिलं होतं. जेव्हा तिनं मेसेज पाठवणा-याला त्यांची ओळख विचारली, तेव्हा त्यानं जुजबी उत्तर दिलं. घाबरलेल्या त्या तरुणीनं संपूर्ण घडलेला प्रकार स्वतःच्या मोठ्या भावाला सांगितला. भावानंही त्या गेममध्ये सहभागी न होण्यास सांगितलं. पीडित विद्यार्थिनीनं घडलेल्या प्रकाराबाबत पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंदवला असून, तपास सुरू आहे. 

सावधान! ब्लू व्हेल आणि किकी चॅलेंजपेक्षा धोकादायक आहे 'हा' खेळMomo Challenge : मोमो चॅलेंजचा भारतात पहिला बळी?, गळफास घेऊन विद्यार्थिनीची आत्महत्याब्लू वेल चॅलेंजनंतर आता इंटरनेटवर मोमो चॅलेंज गेम व्हायरल होत आहे. अनेक देशातील तरुण आणि लहान मुलं मोमो चॅलेंज गेमचा शिकार होत आहेत. तर मोमो चॅलेंजमुळे भारतातील पहिला बळी गेल्याचे वृत्त समोर आले होतं. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील अजमेर येथे इयत्ता दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मुलीच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांनी आत्महत्येमागील कारण मोमो चॅलेंज असल्याचा संशय व्यक्त करत चौकशीची मागणी केली आहे. मोमो चॅलेंजच्या माध्यमातून धमकी मिळल्यानंतर युजर घाबरतो आणि ते चॅलेंज पूर्ण करण्यास तयार होतो. गेम खेळताना अनेक जण नैराश्यात जातात. तसेच पुढे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात. हा जीवघेणा खेळ लहान मुलांना आणि तरुणांना प्रामुख्याने टार्गेट करतो. 

असं आहे मोमो चॅलेंज

- सर्वप्रथम यूजरला एक अनोळखी नंबर मिळतो. तो मोबाईलमध्ये सेव्ह केल्यानंतर Hi-Hello करण्याचं चॅलेंज दिलं जातं. 

- अनोळखी नंबरवर त्यानंतर युजरला बोलण्याचे चॅलेंज दिले जाते. 

- या नंबरवरून पुढे युजर्सला चित्रविचित्र घाबरवणारे फोटो आणि व्हिडीओ क्लिप पाठवल्या जातात.

- मोमो चॅलेंजमध्ये पुढे युजर्सना काही टास्क दिले जातात. ते पूर्ण केले नाहीत तर त्यांना धमकावलं जातं. 

- धमक्यांना घाबरल्यामुळे युजर्स पुढे आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात. 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअॅपMomo Challengeमोमो चॅलेंज