नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचे मोठे संकट उद्भवणार्या 400 विदेशी जमातींविरोधात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. कनिष्ठ न्यायालयांकडून त्यांना एक दिवसाची शिक्षा करण्याशिवाय पाच ते दहा हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. दिल्लीत एकूण 950 विदेशी जमातींना अटक केली, तर उर्वरित 1550 जमातींविरोधात कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाण्यासाठी कारवाई केली जात आहे.
ज्या जमातींविरोधात कारवाई केली जात आहे, त्याविषयीची माहिती त्यांच्या देशातील दूतावासांना दिली जात आहे. जेणेकरुन आरोपी, दूतावासाच्या सहाय्याने एफआरआरओमधून ते व्हिसा मिळवू शकतील आणि आपल्या देशात परत जातील. पोलीस या जमातींविरोधात जारी केलेले लुक आऊट नोटीसही मागे घेत आहेत. गृहमंत्रालयाने सर्व विदेशी जमातींना भारतात येण्यास दहा वर्षांची बंदी घातली आहे. बरीच वर्षे हे जमाती पर्यटक व्हिसावर भारतात येत असत आणि देशभरात अवैधपणे या धर्माचा प्रचार करत असत, असे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे.
दिल्लीत हजरत निजामुद्दीन स्थित तबलिगी मरकजमध्ये 13-15 मार्चला एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्यासाठी मरकज प्रमुख मौलाना साद यांनी अनेक देशातील लोकांना आमंत्रित केले होते. 15 हजाराहून अधिक विदेशी नागरिक जमातमध्ये सामील होण्यासाठी आले होते. यानंतर मोठ्या संख्येने विदेशी आपल्या देशात परतले. मात्र, लॉकडाऊनमुळे जवळपास 2500 विदेशी भारतात अडकले होते.
दिल्ली पोलिसांनी दिल्लीच्या विविध भागात लपून बसलेल्या 950 विदेशी जमातींचा शोध घेऊन त्यांना अटक केली. तसेच, देशातील इतर 16 राज्यात 1550 विदेशी जमाती ताब्यात घेण्यात आले. म्हणजेच 17 राज्यातील 2500 जमातींविरोधात राज्यांतील पोलिसांनी 14 बी विदेशी कायदा, तीन महामारी कायदा, 51आपत्ती व्यवस्थापन कायदा, सरकारी आदेशाचे पालन न करणे, कोरोना संसर्ग असूनही दुर्लक्ष करण्याच्या तीन कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली. तसेच, लॉकडाउन संपल्यानंतर गेल्या महिन्यात त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले.
पोलिसांच्या आरोपपत्राची दखल घेत गेल्या काही आठवड्यांपासून न्यायालयात जमातींविरोधात दररोज सुनावणी सुरु आहे. चूक मान्य केल्यानंतर त्यांना सुनावणी होईपर्यंत कोर्टात उभे केले जाते. तसेच, 5-10 हजार रुपये दंडही आकारला जात आहे.अन्य राज्यातही अशीच कारवाई केली जात आहे. जमातींना पकडण्यापूर्वीच लूक आऊट नोटीस काढले गेले होते. जेणेकरून कोणीही देशातून पळून जाऊ नये. प्रत्येकाचे व्हिसा रद्द आणि काळ्या यादीत टाकले गेले होते. दिल्लीत ज्या 400 जमातींविरोधात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आहे, त्यामधील मलेशिया आणि सुदानमधील सुमारे 100 जमाती आपल्या देशात परत गेले आहेत.
आणखी बातम्या...
बाटलीबंद पाण्याला २० रुपये अन् दुधाला १७ रुपये दर, हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे - राजू शेट्टी
Oxford नंतर चीनची लस होतेय यशस्वी, कोरोनाशी लढण्याची वाढवते ताकद...
मध्य प्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे निधन
दूध तापलं! स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर फोडला...
रावणाने पहिले विमान उड्डाण केले, सिद्ध करण्याचा श्रीलंकेचा दावा
सरकारी कर्मचार्यांसाठी खूशखबर! नाईट शिफ्ट केली तर आता असा होणार फायदा...