श्रीनगर : पाकव्याप्त काश्मीरमधून जम्मू-काश्मीरमध्ये २० दहशतवाद्यांनी घुसखोरी केली असून, ते सुरक्षा दलांचे कॅम्प व वाहनांवर मोठा हल्ला करण्याची शक्यता असल्याची माहिती गुप्तचर संघटनांना मिळाली आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यात हाय अॅलर्ट जारी करण्यात आला पाकिस्तानातून घुसखोरी करणारे हे दहशतवादीजैश-ए-मोहम्मदचे असल्याचे सांगण्यात येत आहे.लष्कराच्या विविध ठिकाणांवर येत्या काही दिवसांत आत्मघाती हल्ले होऊ शकतात. हे प्रकार 'हिट अॅण्ड रन'सारखे म्हणजे हल्ला करून लगेच पळून जाण्याचे असू शकतील, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे. ही पठाणकोट व सुंझवान हल्ल्यांप्रमाणे यावेळी काही घडू नये, याची दक्षता घेण्यात येत आहे. गस्ती पथके, पोलिस तसेच सुरक्षा दलांच्या चौक्या, लष्कराची ठिकाणे या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला आहे. केंद्राने रमजानच्या महिन्यात दहशतवादविरोधी कारवाया थांबवण्याची घोषणा केली होती. मात्र अतिरेक्यांनी हल्ले केल्यास त्यास त्याच भाषेत उत्तर दिले जाईल, असेही जाहीर केले होते. त्यानंतर दहशतवादी कारवायांमध्ये वाढ होत चालली आहे. जवानांच्या गस्ती पथकावर हल्ला करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांनी बुधवारी खातमा केला होता.
काश्मीरमध्ये २0 अतिरेक्यांची घुसखोरी, हल्ल्याच्या शक्यतेने हाय अॅलर्ट जारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2018 4:54 AM