श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील त्रालमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे.
सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुलवामाच्या त्रालमध्ये चकमक सुरू झाली. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून शस्त्रसंधीचे उल्लंघन करून दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी यासाठी पाकिस्तानकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, याला भारतीय सुरक्षा रक्षकांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरच्या नियंत्रण रेषेजवळील मेंधार सेक्टरमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा रक्षकांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. 9 फेब्रुवारी रोजी मेंधार सेक्टरमध्ये भारतीय सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला भारतीय सुरक्षा रक्षकांनी चोख प्रत्युत्तर दिले. याचबरोबर, मेंधार सेक्टरमध्ये पाकिस्तानी रेंजर्सकडून शस्त्रसंधीचे उल्लंघनही करण्यात आले. काही दिवसांपूर्वी विविध ठिकाणी पाकिस्तानकडून अशा प्रकारे शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. त्यावेळी भारतीय सुरक्षा रक्षकांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले होते.
महत्त्वाच्या बातम्या
५० हून अधिक भीषण स्फोटांनी हादरली डोंबिवली
७३ हजार लोकांना संसर्ग; कोरोनाचे १९०० बळी
भूखंडाचे श्रीखंड : सरकारी जमीन लाटली, आम्ही नाही पाहिली
एचएसबीसी बँकेतील ३५ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार!