नवी दिल्लीः मोदी सरकारनं जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवलं असून, जम्मू-काश्मीर आणि लडाख अशा केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती केली आहे. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटविण्याचे प्रस्तावित विधेयक सोमवारी राज्यसभेत मंजूर करण्यात आले. यानंतर आज लोकसभेत कलम 370 वर वादळी चर्चा झाल्यानंतर हे विधेयक 351 विरुद्ध 72 मताधिक्याने पारित झाले. त्यामुळे केंद्रातील मोदी सरकारचा ऐतिहासिक विजय झाला आहे.यादरम्यान लडाखचे भाजपाचे खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांनी जोरदार भाषण केलं. लोकसभेत 370वर झालेल्या वादळी चर्चेत त्यांच्या भाषणानं सगळेच प्रभावित झाले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला होता. नामग्यालनं आता ट्विट करत एक अडचण सांगितली आहे. ते म्हणाले, फेसबुकवर आणखी अधिक लोकांची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू शकत नाही. कारण फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण्याची मर्यादा संपुष्टात आलेली आहे.कारण 5 हजारांची मर्यादा केव्हाच पार झाली आहे. त्यामुळे माझ्या फेसबुक पेजला लाइक करा आणि तिकडेच सक्रिय राहा. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नामग्याल यांनी केलेलं भाषण उत्कृष्ट असल्याचं म्हटलं आहे. ते लडाखमधल्या आमच्या बहीण आणि भावांच्या अपेक्षांची पूर्तता करतील. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही त्यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली होती.
Jammu and Kashmir : 370वर जोरदार भाषण देणारा खासदार हैराण; म्हणे, 'अधिक फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू शकत नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 1:00 PM