शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs BAN: टीम इंडियाचा Shivam Dube टी२० मालिकेतून बाहेर; Mumbai Indians च्या फलंदाजाला मिळाली संधी
2
Exit Poll: हरियाणामध्ये सत्ताधारी भाजपासाठी एक्झिट कौल, कांग्रेस मारणार जोरदार मुसंडी 
3
'आप' मंत्र्याने विरोधी पक्षनेत्यांचे धरले पाय, दिल्लीत राजकीय नाट्य, फोटो व्हायरल
4
Exit Poll: काश्मीरमध्ये कोण बाजी मारणार? भाजपा की इंडिया आघाडी, समोर आली धक्कादायक आकडेवारी
5
PM Modi Flags off Mumbai Metro 3: मुंबईकरांचं भुयारी मेट्रोचं स्वप्न पूर्ण, मोदींच्या हस्ते मेट्रो-३ चं लोकार्पण; पंतप्रधानांचा बीकेसी ते सांताक्रूझ प्रवास!
6
रिया चक्रवर्ती हाजिर हो... ५०० कोटींच्या फसवणूक प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्रीला पोलिसांचे समन्स
7
भारताचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच पाकिस्तानात जाणार; बातमी ऐकून फारूख अब्दुल्ला खुश!
8
हिजबुल्लाहचा नवा प्रमुख सैफुद्दीन आठवडाभरही कमान सांभाळू शकला नाही, इस्रायलच्या हल्ल्यात ठार!
9
जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती
10
T20 WC 2024 : चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचे एकतर्फी वर्चस्व! श्रीलंकेचा उडवला धुव्वा; मिचेल स्टार्कचीही हजेरी
11
मतदान करून येणाऱ्या वृद्धाला विचारलं मत कुणाला दिलं? काँग्रेसचं नाव घेताच बेदम मारलं
12
"निवडणूक लढलो नाही याचा अर्थ…’’, हरियाणात मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेस नेत्याचं सूचक विधान
13
Eknath Shinde : "मोदीजी देशाची शान; महाराष्ट्रात येतात तेव्हा रिकाम्या हाताने येत नाहीत, भरभरून देतात"
14
ट्रेडिंगच्या नावाखाली सुरूये मोठा फ्रॉड! 'हे' ॲप लगेच मोबाईलमधून काढून टाका
15
T20 WC 2024 : "उत्तर भारतातील...", मांजरेकर बोलताना फसले; चाहत्यांनी केली हकालपट्टीची मागणी
16
अजितदादांना धक्का बसणार, रामराजे नाईक निंबाळकर तुतारी फुंकणार?
17
अभिजीतचा 'तौबा-तौबा' तर सूरजचा 'झापुकझुपुक' डान्स; ग्रँड फिनालेचा पहिला प्रोमो बघाच
18
"गुंडांनी आमचा पाठलाग सुरू केला अन्..."; मुलींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
19
"आता भाजपाकडूनही मोघलशाही सुरू", संभाजीराजे छत्रपती पोलिसी कारवाईनंतर भडकले
20
"आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवणार, जातीनिहाय जनगणना कायदेशीरपणे मंजूर करून घेणार’’, राहुल गांधींची घोषणा  

जम्मू-कश्मीरला मिळणार पहिला हिंदू मुख्यमंत्री? भाजपची मोठी रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 6:57 PM

Jammu and Kashmir Assembly Elections 2024: जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या नियमांनुसार ९०  सदस्य निवडले जातील, तर ५ सदस्यांचे नामांकन  करण्यात यावे, असा प्रस्ताव भाजपकडून मांडण्यात आला आहे.

Jammu and Kashmir Assembly Elections 2024: जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या ९० जागांचे निकाल ८ ऑक्टोबरला लागणार आहेत.  मात्र भाजपने जम्मू-कश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. श्रीनगरमध्ये कमळ फुलवण्यात मग्न असलेला भाजप पहिल्यांदाच एकाच वेळी दोन आघाड्यांवर राजकीय बुद्धिबळाचा पट मांडला आहे. जम्मू-कश्मीरमध्ये सध्या पक्षाची कमान प्रभावी नेते राम माधव यांच्या खांद्यावर आहे.

भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी ज्या प्रकारे निवडणुकांमध्ये मतदान झाले आहे. ते पाहता भाजप सरकार स्थापनेसाठी ४८ चा जादुई आकडा सहज गाठेल असे पक्षाला वाटते. उपराज्यपालांच्या अधिकारामुळेही या अपेक्षांना बळ मिळाले आहे. भाजप हे समीकरण लावण्यात यशस्वी ठरल्यास खोऱ्याला पहिला हिंदू मुख्यमंत्री मिळू शकतो, असे म्हटले जात आहे.

उपराज्यपालांसाठी जबाबदार ५ सदस्यांचे नामांकनजम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या नियमांनुसार ९०  सदस्य निवडले जातील, तर ५ सदस्यांचे नामांकन  करण्यात यावे, असा प्रस्ताव भाजपकडून मांडण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल हे नामांकन करतील. मात्र, काँग्रेस आणि विरोधी पक्ष याला विरोध करत आहेत. या नामांकनाचा सरकार स्थापनेवर परिणाम होईल,  असे काँग्रेसचे कार्याध्यक्ष रमण भल्ला, यांनी म्हटले आहे.

जम्मू-काश्मीर भाजपचे मुख्य प्रवक्ते सुनील सेठी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एलजी विधानसभेच्या स्थापनेसोबत या ५ सदस्यांना नामनिर्देशित करेल. ही तरतूद आधीच आहे. उपराज्यपाल ८ ऑक्टोबर रोजी किंवा नंतर कधीही या संदर्भात अधिसूचना जारी करू शकते. नियमांनुसार एलजी २ महिला आणि ३ काश्मिरी विस्थापित पंडितांना आमदार म्हणून नामनिर्देशित करू शकतात. निवडून आलेल्या आमदारांइतकीच पॉवर या सर्वांची असेल. सर्व आमदारांना सरकार स्थापनेसाठी मतदान करता येणार आहे.

५ सदस्यांचे नामांकन भाजपसाठी कसे फायदेशीर ठरू शकते? याबाबत राजकीय विश्लेषकांच्या मते,  जम्मू- कश्मीरात कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळणे कठीण आहे. अशा परिस्थितीत या ५ आमदारांना उमेदवारी देणे भाजपसाठी फायदेशीर ठरू शकते. भाजपने कसा तरी ४३ चा आकडा गाठला तर या ५ च्या मदतीने सरकार स्थापन करण्यासाठी ४८ चा जादुई आकडा सहज गाठू शकेल.  हे ५ सदस्य उपराज्यपालद्वारे नामांकित केले जातील आणि उपराज्यपाल हे केंद्राचे प्रतिनिधी आहेत. सध्या केंद्रात भाजपचे सरकार आहे, त्यामुळे नामनिर्देशित सदस्य दुसऱ्याच्या बाजूने उभे राहण्याची अजिबात शक्यता नाही.

४३ चा आकडा गाठण्याचा भाजपचा मास्टर प्लॅनजम्मू-काश्मीरमध्ये एकूण ९० जागांसाठी विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यापैकी ४३ जागा जम्मू विभागातील आहेत आणि ४७ जागा काश्मीर विभागातील आहेत. जम्मू भागात भाजपची स्थिती मजबूत आहे. जम्मू-काश्मीर भाजपचे मुख्य प्रवक्ते सुनील सेठी यांच्या मते, यावेळी भाजप सर्वात मोठा पक्ष बनणार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला जम्मू प्रदेशात २९ जागांवर आघाडी मिळाली होती. यावेळी त्यांची संख्या वाढण्याची पक्षाला आशा आहे. खोऱ्यातील काही जागा जिंकण्याचीही पक्षाला आशा आहे.

भाजपशी संबंधित सूत्रांचे म्हणणे आहे की, पक्षाने जमिनीवर मजबूत स्थितीत असलेल्या अपक्ष आमदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. हे काम भाजपचे ज्येष्ठ नेते राम माधव स्वत: करत आहेत. २०२४ मध्ये राम माधव यांच्या प्रयत्नांमुळेच भाजप पीडीपीसोबत सरकारमध्ये येऊ शकले. यावेळी अपक्ष आमदार खोऱ्यात अनेक जागा जिंकतील अशी अपेक्षा आहे. हे अपक्षच सरकारचे किंगमेकर ठरणार आहेत, त्यामुळे या अपक्षांना आपल्याकडे खेचण्यासाठी दोन्हीकडून प्रयत्न सुरू झाले आहेत. ८ ऑक्टोबरला निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर सरकार स्थापनेच्या प्रयत्नांना वेग येईल. भाजपने स्वबळावर ३०-३५ जागा जिंकल्या तर सरकार स्थापनेच्या शर्यतीत आघाडीवर असेल.

टॅग्स :jammu and kashmir assembly election 2024जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४BJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीर