शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

सैरभैर 'पाक'चा क्रूरपणा ! काश्मिरी जनतेवर गोळीबार, दोन जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 8:36 AM

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत.

श्रीनगर - सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. शुक्रवारी (19 जानेवारी) सकाळी पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले आहे. पाकिस्ताननं 24 तासांमध्ये दुस-यांदा गोळीबार केला आहे. जम्मूमधील आर.एस.पुरा सेक्टर, अर्निया व रामगड सेक्टर परिसरात पाकिस्तानकडून गोळीबार सुरू आहे. दरम्यान, गोळीबारात दोन नागरिकांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाले आहेत. गुरुवारीदेखील (18  जानेवारी) आर.एस.पुरा सेक्टरमध्ये पाकिस्ताननं गोळीबार केला होता. पाकिस्तानच्या या हल्ल्याला भारतीय जवानांकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे.  बीएसएफच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानकडून  30 -40 भारतीय चौक्यांना टार्गेट करण्यात येत आहे. शिवाय, पाकिस्तानी रेंजर्स भारतीय नागरिकांना निशाणा बनवत आहेत.  

गुरुवारी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत भारतानं एकूण 3 पाकिस्तानी सैनिकांसहीत 8 जणांचा खात्मा केला आहे. यादरम्यान, पाकिस्तानी रेंजर्सच्या गोळीबारात बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल ए. सुरेश शहीद झालेत.  

 

 

पाकिस्तानला धडा शिकवा, बीएसएफच्या महासंचालकांचा आदेशभारत-पाकिस्तान सीमेवरील तणाव पाहता सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी पाकिस्तानच्या कुरापतींचा सर्व शक्तीनिशी बदला घेत पाकिस्तानला धडा शिकवावा, असे आदेश सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक के. के. शर्मा यांनी बीएसएफच्या जवानांना दिले आहेत.भारत-पाकिस्तान सीमेवरील स्थिती तणावपूर्ण आहे. नियंत्रण रेषेलगत गोळीबार केल्यानंतर पाकिस्तानी सैनिकांनी आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या नागरी वस्त्या आणि भारतीय लष्कराच्या सीमा चौक्यांना लक्ष्य केले. पाकिस्तानी रेंजर्सच्या गोळीबारात शहीद झालेले जवान ए. सुरेश यांच्या स्मृतीस श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर महासंचालक शर्मा म्हणाले की, बीएसएफचे हेड कॉन्स्टेबल ए. सुरेश यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. पाकिस्तानी रेंजर्सनी झाडलेली एक गोळी सीमेवरील खंदकातील निमुळत्या खिंडारातून पार होत या जवानाला लागली. पाकिस्तानच्या बाजूनेच वारंवार भारतीय हद्दीत विनाकारण गोळीबार आणि उखळी तोफांचा भडिमार केला जातो. तथापि, आम्ही दरवेळी पलटवार करून या अगोचरपणाचा बदला घेत असतो, असे शर्मा म्हणाले. 

ही युद्धजन्य स्थिती धोकादायकच आहे. जीवितहानी टाळण्यासाठी अभेद्य शिरस्त्राण आणि जाकीट असले तरी शरीराचे इतर भाग असुरक्षितच असतात. पाकिस्तानी सैनिकांकडून भारतीय हद्दीत विनाकारणगोळीबार करण्याची ही काही पहिली घटना नाही. ३ जानेवारी रोजी पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद झाला होता. त्यावेळी आम्ही ताकदीने पलटवार करून बदला घेतला होता.

पाकिस्तानी रेंजर्सचा गोळीबार : मुलीचा मृत्यूजम्मू : पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू आणि सांबा जिल्ह्यांलगत आंतरराष्ट्रीय सीमेवरील भागातील चौक्या आणि गावांवर गोळीबारासोबत केलेल्या तोफमाºयात सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान शहीद झाला. तसेच एक मुलीचाही मृत्यू झाला. पाकिस्तानी रेंजर्सनी आर.एस. पुरा, अर्निया आणि रामगढ विभागातील आंतरराष्ट्रीय सीमेलगतच्या नागरी वस्त्या आणि लष्कराच्या चौक्यांवर निशाणा साधत बुधवारी रात्री 9 वाजेपासून गोळीबारासोबत तोफगोळ्यांचा भडिमार सुरू केला.पाकिस्तानी रेंजर्सच्या या कुरापतींना बीएसएफच्या जवानांनी चोख उत्तर देत पलटवार केला. पाकिस्तानी सैनिकांनी आंतरराष्ट्रीय  सीमेलगतच्या 20 नागरी वस्त्यांना हल्ल्याचे लक्ष्य केले. शेवटचे वृत्त येईपर्यंत गुरुवारी ६.४५ वाजेपर्यंत पाकिस्ताच्या बाजूने अधूनमधून गोळीबार आणि तोफमारा सुरूच होता.यात बीएसएफचा अन्य एक जवान जखमी झाला असून, या जवानाला इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. शहीद झालेले जवान ए. सुरेश तामिळनाडूचे होते. तर मृत पावलेल्या मुलीचे नाव नीलम देवी आहे. पाकिस्तानच्या बाजूने शस्त्रबंदीचे उल्लंघन केले जात असल्याने प्रशासनाने अधिका-यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानIndiaभारत