शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"EVM चे रडगाणे थांबवा, आता हवे तसे निकाल येत नाहीत"; ओमर अब्दुल्लांचा काँग्रेसला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 11:50 IST

जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी काँग्रेस पक्षाचे ईव्हीएमवरील आरोप फेटाळून लावले आहेत.

Omar Abdullah On EVM: हरियाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेस ईव्हीएमविरोधात चांगलीच आक्रमक झाली आहे. ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. मात्र आता जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी  काँग्रेसचा आक्षेप फेटाळून लावला आहे. काँग्रेसने ईव्हीएमवर रडणे थांबवावे आणि आपला पराभव स्वीकारावा, असा सल्ला मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनी दिला. तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम ठीक असते, पण जेव्हा तुम्ही हरता तेव्हा तुम्ही ईव्हीएमबद्दल रडायला लागता, असंही ओमर अब्दुलांनी म्हटलं. यावर काँग्रेसनेही जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ईव्हीएम छेडछाडीचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावत काँग्रेसलाही या मुद्द्यावरुन गोंधळ घालणं थांबवण्याचा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री अब्दुल्ला यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला असून त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर आमचे सहकारी असे का वागत आहेत, असा सवाल काँग्रेसने केला आहे.

"पराभवासाठी ईव्हीएमला बळीचा बकरा बनवू नये. ईव्हीएममधून शंभरहून अधिक खासदार निवडून आल्यावर तुम्ही त्या विजयाचा आनंद साजरा करता. पण काही महिन्यांनी ईव्हीएम योग्य निकाल देत नाही, असे म्हणता येणार नाही. कारण, आता निवडणुकीचे निकाल हवे तसे येत नाहीत," असं ओमर अब्दुल्ला यांनी एका मुलाखतीमध्ये म्हटलं.

काँग्रेस नेते मणिकम टागोर यांनी ओमर अब्दुल्ला यांना प्रत्युत्तर दिलं आहे. "समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ईव्हीएमविरोधात बोलले आहेत. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला कृपया तुमची तथ्ये तपासा. काँग्रेसने स्पष्टपणे सीडब्ल्यूसी प्रस्ताव केवळ निवडणूक आयोगासमोर मांडला. मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांबद्दल अशी वृत्ती का?," असा सवाल  मणिकम टागोर यांनी केला. 

टॅग्स :Omar Abdullahउमर अब्दुल्लाEVM Machineईव्हीएम मशीनcongressकाँग्रेस