श्रीनगर - दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील इमाम साहिब भागात मनिहाल गावामध्ये आज भारतीय सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली. यामध्ये चकमकीत लष्कर-ए-मुस्तफा आणि लष्कर-ए-तोयबाचे चार दहशतवादी मारले गेले आहेत. या चारही दहशतवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीदरम्यान चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं. तर एक जवान जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यामध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात लष्कराला मोठं यश आलं आहे. आमिर शरीफ, रईस अहमद भट, आकिब मलिक आणि अल्ताफ अहमद वानी अशी चार दहशतवाद्यांची नावं आहेत. हे दहशतवादी लष्कर-ए-मुस्तफा आणि लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनांशी संबंधित होते. तसेच गेल्या सहा महिन्यांपासून आपल्या घरातून बेपत्ता झाले होते. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र जमा करण्यात आली आहेत.
चकमकीदरम्यान एक जवान जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरू आहेत. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.