श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये जवानांवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. सीआरपीएफच्या ताफ्यावर लाल चौक परिसरात ग्रेनेड हल्ला झाला आहे. या हल्ल्यामध्ये दोन जवान आणि दोन नागरिक असे चार जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (2 फेब्रुवारी) श्रीनगरमधील लाल चौकात दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला आहे. श्रीनगरमधील प्रताप पार्क जवळील लाल चौकात सीआरपीएफची तुकडी तैनात करण्यात आली होती. C/171 तुकडीवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. यात दोन जवान आणि नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे.
जम्मू आणि काश्मीर खोरे यांना जोडणाऱ्या जम्मू-श्रीनगर महामार्गावर मोठ्या घातपाताचा डाव काही दिवसांपूर्वी सुरक्षा दलांनी उधळून लावला होता. जम्मू-श्रीनगर महामार्गावरील नगरोटा येथील बान टोल प्लाझाजवळ चकमकीदरम्यान लष्कराने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. जम्मू-श्रीनगर महामार्गावर असलेल्या नगरोटाजवळील बान टोल प्लाझा येथे संशयित ट्रक अडवल्यानंतर आतमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या गोळीबारात एक जवान जखमी झाला. त्यानंतर उडालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले. तर अन्य दहशतवादी आसपासच्या परिसरात लपून बसले होते. या दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी सुरक्षा दलांनी परिसराचा ताबा घेत शोधमोहीम सुरू केली होती. अखेरीस या दहशतवाद्यांना शोधून ठार केले.
पोलिसांच्या एका जवानाने धाडस दाखविल्याने शुक्रवारी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. दहशतवाद्यांचे हे एन्काउन्टर जम्मूपासून 28 किमी अंतरावरील एका टोल प्लाझावर करण्यात आले. हे दहशतवादी एका ट्रकमध्ये लपलेले होते. त्यांच्याकडे 5 रायफल, आरडीएक्स आणि बुलेटप्रूफ जॅकेटही होती. ते राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या हल्ल्याच्या तयारीत होते. यानंतचर पोलिसांनी ट्रक ड्रायव्हरला अटक केली. धक्कादायक म्हणजे पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला करणाऱ्याचा तो भाऊ आहे.
दहशतवादी आदिल डारने गेल्या वर्षी फेब्रुवारीला पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर स्फोटकांनी भरलेली एसयुव्ही आदळवली होती. यामध्ये 40 जवान शहीद झाले होते. याच आदिलचा भाऊ समीर डार याने गुरुवारी रात्री उशिरा 2 वाजता कठुआ जिल्ह्यातील हीरानगर सेक्टरमधून तीने ते चार दहशतवाद्यांना ट्रकमध्ये बसविले होते. हे दहशतवादी राष्ट्रीय सीमेवरून घुसखोरी करून जम्मूमध्ये घुसले होते. हे सर्व ट्रकमध्ये मागच्याबाजुला लपलेले होते आणि काश्मीरला जात होते.
महत्त्वाच्या बातम्या
'हे तर ठग्ज ऑफ मुंबईकर!', आशिष शेलारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
यापुढे सरकारी प्रशिक्षण मदरसे, बारमध्ये ठेवा; आशिष शेलार संतापले
Budget 2020: केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात नवीन काहीच नाही: प्रकाश आंबेडकर
तहसीलदार मॅडम हिरॉइनसारख्या दिसतात, बबनराव लोणीकरांची जीभ घसरली