Video: अजित डोवालांच्या व्हिडीओतील काश्मिरी लोक विकत आणलेले; गुलाम नबी आझादांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 11:13 AM2019-08-08T11:13:51+5:302019-08-08T11:14:26+5:30
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल काश्मीरमधील सामान्य लोकांना भेटत आहे
नवी दिल्ली - कलम 370 हटवल्यानंतर केंद्र सरकारकडून जम्मू काश्मीरमधील तणावाची परिस्थिती हाताळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बुधवारी शोपिया जिल्ह्यातील नागरिकांची भेट घेतली. या प्रकरणावरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पैसे देऊन लोकांना सोबत घेत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
पत्रकारांनी गुलाम नबी आझाद यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल काश्मीरमधील सामान्य लोकांना भेटत आहे असा प्रश्न विचारला त्यावर उत्तर देताना आझाद म्हणाले की, पैसे देऊन तुम्ही कोणालाही सोबत घेऊ शकता. काश्मिरी लोकांवर कर्फ्यू लावण्यात आला आहे हे भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं आहे.
#WATCH: Ghulam Nabi Azad, Congress on pictures of National Security Advisor (NSA) Ajit Doval interacting with locals in Shopian yesterday: Paise dekar aap kisiko bhi saath le sakte ho. #JammuAndKashmirpic.twitter.com/iJgwezkeWb
— ANI (@ANI) August 8, 2019
बुधवारपासून अजित डोवाल काश्मीरमधील शोपिया जिल्ह्यातील सामान्य माणसांच्या भेटीगाठी करत आहे. काही ठिकाणी ते सामान्यांसोबत जेवतानादेखील दिसत आहे. कलम 370 हटवल्यानंतर डोवाल काश्मीर दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात ते लोकांसोबत जम्मू काश्मीर पोलीस, सीआरपीएफ जवान यांचीही भेट घेत आहेत.
कलम 370 हटवल्याच्या विवादानंतर गुलाम नबी आझाद आज श्रीनगरला जाण्याची शक्यता आहे. या संपूर्ण प्रकरणात ते कार्यकर्त्यांशी बैठक घेण्याची शक्यता आहे. दरम्यान या प्रकरणावरुन काँग्रेस नेत्यांनी वेगवेगळी भूमिका घेतली असल्याचं पाहायला मिळत आहे. काही काँग्रेस नेत्यांचे म्हणणं आहे की, केंद्र सरकारकडून कलम 370 हटविण्याचा निर्णय योग्य आहे. तर काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलत असल्याचा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे.
#WATCH Jammu and Kashmir: National Security Advisor Ajit Doval interacts with locals in Shopian, has lunch with them. pic.twitter.com/zPBNW1ZX9k
— ANI (@ANI) August 7, 2019
जम्मू काश्मीरमधील स्थिती सध्या तणावग्रस्त आहे. फुटिरतावादी नेत्यांकडून राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो या कारणास्तव खबरदारी म्हणून अनेक ठिकाणी जवान तैनात आहेत. गुरुवारी सकाळी येथील बाजारपेठा उघडण्यात आल्या. जम्मूतील लोकं दैनदिन व्यवहार करण्यासाठी बाहेर पडू लागले आहेत. तर दुसरीकडे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी कलम 370 हटविण्याच्या मुद्द्यावरुन देशाला संबोधित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यावर काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.
#JammuAndKashmir: Latest visuals from Jammu as people move about for essential work. pic.twitter.com/sXBehw5tG4
— ANI (@ANI) August 8, 2019