जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी होत आहे. खोऱ्यातील या बिघडलेल्या हवामानामुळे अनेक ठिकाणी पर्यटकही अडकून पडले आहेत. यासाठी पोलिसांनी लोकांना मदत करण्यासाठी हेल्पलाइन नंबरही जारी केले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या हिमवर्षावाच्या पार्श्वभूमीवर सहा जिल्ह्यांमध्ये हिमस्खलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
पुढील २४ तासांत पुंछ, बारामुल्ला, बांदीपोरा आणि कुपवाडा जिल्ह्यांमध्ये २,४०० मीटरपेक्षा जास्त उंचीवर मध्यम हिमस्खलन होण्याची शक्यता आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, जम्मू-काश्मीरमध्ये श्रीनगर-लेह महामार्गावरील झोजिला अक्षरेखेसह वरच्या भागात पुन्हा बर्फवृष्टी झाली, तर मैदानी भागात पाऊस झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आज सकाळी ६.२० वाजता ट्रॅफिक अपडेटनुसार, टी-२ टर्मिनलवर दगड पडल्यामुळे एनएचडब्ल्यूवर मुसळधार पाऊस आणि रामसू व बनिहाल दरम्यान बर्फवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर एनएचडब्ल्यूवर वाहतूक कोंडी झाली. रस्ता मोकळा होईपर्यंत लोकांना एनएचडब्ल्यूवर प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच, मुघल रोड आणि एसएसजी रोड बर्फ साचल्यामुळे आधीच बंद आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रवाशाने प्रवास सुरू करण्यापूर्वी वाहतूक नियंत्रण युनिटकडून चौकशी करण्याची आवश्यता आहे.
पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारीखराब हवामान, पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीत मदत मिळविण्यासाठी सामान्य लोकांना सुविधा देण्यासाठी बारामुल्ला पोलिसांनी आपत्कालीन हेल्पलाइन सेवा सुरू केली आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, सामान्य जनता खालील नंबरवर संपर्क करू शकतात.
पुलिस नियंत्रण बारामुल्ला (पीसीआर)-०१९५२-२३४४१००१९५२-२३७८३०९५९६७६७७६८९५९६७६७७१७