Government Jobs : जम्मू आणि काश्मीर हायकोर्टात भरती, पहिल्यांदाच सर्व भारतीयांठी अर्ज खुला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 03:57 PM2019-12-31T15:57:44+5:302019-12-31T15:58:15+5:30
Jammu and Kashmir High Court Jobs : जम्मू-काश्मीरला विशेष राज्याच्या दर्जा बहाल करणारे कलम 370 रद्द करून जम्मू-काश्मीर
श्रीनगर - मोदी सरकारने जम्मू आणि काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेले कलम 370 हटवल्यानंतर देशातील सर्वच राज्यातील नागरिक तेथे नोकरीसाठी पात्र ठरत आहेत. त्यामुळे, जम्मू-काश्मीरउच्च न्यायालयाने राज्याबाहेरील उमेदवारांना नोकरीची दारे अखेर खुली केली आहेत. न्यायालयाने 33 रिक्त जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून, याकरिता देशभरातील पात्र उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याच्या दर्जा बहाल करणारे कलम 370 रद्द करून जम्मू-काश्मीर व लडाखला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आला आहे. त्यानंतर पहिल्यांदाच राज्याबाहेरील उमेदवारांना येथे नोकरीची संधी देण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयाचे महानिबंधक संजय धार यांनी 26 डिसेंबरला रोजी न्यायालयातील नोकरीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यासाठी उमेदवारांना 31 जानेवारी 2020 पर्यंत अर्ज सादर करावयाचे आहेत.
दरम्यान, यापूर्वी भारतीय नागरिकांना म्हणजे इतर जम्मू आणि काश्मीर वगळता इतर राज्यातील नागरिकांना जम्मू आणि काश्मीरमध्ये नोकरीसाठी अर्ज करता येत नव्हता. केवळ भारतीय लोकसेवा आयोगातील नोकरशहांचीच येथे पोस्टींग होत असे. मात्र, आता देशभरातील नागरिक येथील केंद्र सरकारच्या नोकरीसाठी अर्ज करू शकत आहेत.
या लिंकवर संपूर्ण जाहीरात पाहू शकता
http://jkhighcourt.nic.in/doc/upload/notices/advertisement%20notice_09_2019.pdf