सरकारी शाळांची इमारत आणि त्यामधील शिक्षण याबाबत देशभरात जोरदार चर्चा सुरू आहे. शाळांमधील शिक्षणाचा स्तर सुधारण्यावर आणि चांगल्या शाळांच्या इमारती बांधण्यावरही सरकारचा भर आहे. याच दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथील जीर्ण झालेल्या शाळेची व्यथा मांडणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियाच्या फेसबुक प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये सीरत नाज नावाची एक चिमुरडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक चांगली आणि सुंदर शाळा बनवण्याचे हृदयस्पर्शी आवाहन करताना दिसत आहे.
चिमुकली या व्हिडीओमध्ये संपूर्ण शाळेची दुर्दशा दाखवते आणि ही शाळा अधिक चांगली व्हावी यासाठी मोदींना आवाहन करत आहे. सीरत नाझ या तरुण विद्यार्थिनीने तिच्या व्हिडिओमध्ये शाळेची इमारत, शौचालय, शिक्षक आणि मुख्याध्यापक कार्यालय इत्यादींची जीर्ण अवस्था दाखवली आहे. चिमुकली म्हणते की ती तिच्या मैत्रिणींसोबत शाळेत एका खराब जमिनीवर बसते आणि देशाच्या पंतप्रधानांनी तिची शाळा चांगली करावी अशी तिची इच्छा आहे.
फेसबुकवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये दिसणारी विद्यार्थिनी जम्मू-काश्मीरच्या (J&K) कठुआ जिल्ह्यातील लोहाई-मल्हार गावची रहिवासी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे इच्छा व्यक्त करताना ती म्हणते - "कृपया मोदीजी, एक चांगली शाळा बनवा."हा व्हिडिओ जम्मू-काश्मीरच्या 'मार्मिक न्यूज' नावाच्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत सुमारे 2 मिलियन लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे आणि आतापर्यंत 1,16,000 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
मुलगी सांगते की, हे स्थानिक सरकारी हायस्कूल आहे, ती या शाळेची विद्यार्थिनी आहे. सुमारे पाच मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये मुलीने संपूर्ण शाळेची दयनीय अवस्था मांडली आहे. संपूर्ण शाळेभोवती फेरफटका मारून ती तिची खराब अवस्था, तुटलेले फरशी, चिखल, कार्यालय आणि शाळेचं स्वच्छतागृह इत्यादी गोष्टी क्रमाने सांगते. हे सर्व दाखवून ती सतत पीएम मोदींना सांगू इच्छिते जेणेकरून शाळा चांगली आणि सुंदर बनवता येईल. मुलगी कॅमेऱ्याकडे पाहते आणि म्हणते, "मोदीजी, मला तुम्हाला काही सांगायचे आहे."
व्हिडीओ संपवताना मुलगी पीएम मोदींना आवाहन करते, “मोदीजी, तुम्ही संपूर्ण देशाचे ऐकता. माझे पण ऐका आणि आमची ही शाळा चांगली बनवा, खूप सुंदर शाळा बनवा म्हणजे आम्हाला असे खाली बसावे लागणार नाही. जेणेकरून आमचा ड्रेस खराब होणार नाही आणि आम्हाला चांगला अभ्यास करता येईल.” मुलीचा हा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"