नवी दिल्ली - केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणाऱ्या कलम ३७० आणि कलम ३५ अ हटवण्याबाबत घेतेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केले. यावेळी जम्मू-काश्मीरमधील विधानसभा आणि लोकप्रतिनिधींबाबत मोठी घोषणा केली. जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश असला तरी येथे विधानसभा असेल. तसेच काश्मिरी जनतेला आधीप्रमाणेच आपले लोकप्रतिनिधी निवडता येतील, असे नरेंद्र मोदींनी सांगितले. नरेंद्र मोदी म्हणाले की, ''फाळणीनंतर अनेक लोक पाकिस्तानमधून भारतात आले. मात्र त्यावेळी काश्मीरमध्ये गेलेल्या निर्वासितांना अद्याप मताधिकार मिळालेला नाही. आज या संबोधनामधून मी जम्मू काश्मिरी जनतेला आश्वस्त करून इच्छितो की, जम्मू-काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश घोषित झाला असला तरी येथे विधानसभा असेल आणि मुख्यमंत्रिही असेल. तसेच येथील जनता पूर्वीप्रमाणेच आपले आमदार निवडून देऊ शकतील. जम्मू-काश्मीरमधील व्यक्तींना पूर्ण पारदर्शकपणे आपला लोकप्रतिनिधी निवडता येईल. तसेच लवकरच येथे निवडणुका होतील, अशी माहिती मोदींनी दिली.
Jammu And Kashmir : जम्मू काश्मीरची विधानसभा आणि लोकप्रतिनिधींबाबत मोदींनी केली मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2019 9:03 PM