नवी दिल्ली - गेल्या दीड महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाली आहे. जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान येथे तब्बल 24 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यामध्ये अनेक जैशच्या दहशतवाद्यांचाही समावेश आहे. दुसरीकडे, अधिकृत आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी याच कालावधी दरम्यान फक्त 8 दहशतवादी मारले गेले होते.
गेल्या वर्षी जम्मू आणि काश्मीर पोलिसांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे आणि नागरिकांना लक्ष्य करून कारवाया तीव्र झाल्या आणि परिणामी मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यातच सुरक्षा दलाचे पाच जवानही शहीद झाले आहेत. त्याच वेळी, या कालावधीत एकही सामान्य नागरिक मारला गेला नसल्याचं अधिकृत आकडेवारीवरून दिसून येत आहे.
2021 मध्ये 193 दहशतवादी ठार झाले. तर 2020 मध्ये 232 दहशतवादी खात्मा झाला. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुासर, आता सुरक्षा दलांमध्ये पूर्वीपेक्षा चांगला समन्वय आहे. 29 जानेवारी रोजी बडगाम आणि पुलवामा येथे झालेल्या कारवाईत जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाचे पाच दहशतवादी मारले गेले होते.
पोलिसांनी दहशतवाद्यांची ओळख जैश कमांडर जाहिद वानी, पाकिस्तानी दहशतवादी वाहिद अहमद रिशी आणि दोन स्थानिक रहिवासी कफील उर्फ छोटा पाकिस्तानी आणि इनायतुल मीर अशी केली. शुक्रवारी गृहमंत्र्यांनी लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा आणि सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत जम्मू-काश्मीरच्या सुरक्षेबाबत आढावा बैठक घेतली. 2018 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाचे 91 जवान शहीद झाले, तर 2021 मध्ये 42 जवान शहीद झाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.